Header AD

महापूर भुस्सखलनामुळे नुकसान झालेल्याना तातडीने मदत घ्यावी - वंचितची मागणी
नालासोपारा, दि. ११ - राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांचे घरे पडली आहे तर काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत देण्यात यावी, शिवाय त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वसई विरार महानगर पालिका अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.          राज्यात पावसामुळे कोकण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या लोकांचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात वंचितचे केली आहे. यावेळी वसई विरार महानगर पालिका महिला आघाडीअध्यक्षा गीता जाधव, महानगर पालिका महासचिव, आशिष गमरे, महिला आघाडी सचिव रेणुका जाधव हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महापूर भुस्सखलनामुळे नुकसान झालेल्याना तातडीने मदत घ्यावी - वंचितची मागणी महापूर भुस्सखलनामुळे नुकसान झालेल्याना तातडीने मदत घ्यावी  -  वंचितची मागणी Reviewed by News1 Marathi on August 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads