Header AD

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांत टिअर २ आणि टिअर ३ शहरे अग्रेसर; महिलांचे प्रमाणही लक्षणीय


क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्सने २६४८% वृद्धी अनुभवली ~


मुंबई, १५ ऑगस्ट २०२१ : भारतातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, वझीरएक्सने भारतातील टीअर २ आणि टिअर ३ शहरांमधून यूझर्सच्या साइनअपमध्ये २६४८% वृद्धी अनुभवली. एक्सचेंजमध्ये ७.३ दशलक्षांपेक्षा जास्त यूझर्स असल्याचे आणि २०२१ मध्ये आजपर्यंतचा सर्वाधिक २१.८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त व्यापार झाल्याचे कंपनीने सांगितले.


  

         टिअर २ आणि टिअर ३ शहरांनी २०२१ मध्ये वझीरएक्सवर एकूण साइनअपमधील जवळपास ५५% वाटा उचलला असून त्यामुळे टिअर १ शहरांना मागे टाकले. त्यांनी २३७५% ची साइनअप वाढ दर्शवली. भारतातील प्रमुख ऑनलाइन पेमेंट गेटवे- रॅझॉरपेच्या अहवालानुसार, टिअर २ व टिअर ३ शहरांनी प्लॅटफॉर्मवर २०२० मध्ये ५४% डिजिटल ट्रान्झॅक्शन दर्शवले. याद्वारे वर्षभरात ९२% वृद्धी नोंदवली.          सतत कमी होत असलेल्या स्मार्टफोनच्या किंमती तसेच स्वस्त व वेगवान इंटरनेटचा प्रवाह यामुळे निम शहरी भाग आणि ग्रामीण भागांमध्ये वेगाने इंटरनेटचा वापर होत आहे. महामारीमुळे झालेल्या लॉकडाउनने या भागातील डिजिटलचा स्वीकार आणखी वेगाने झाला. तसेच भारतातील क्रिप्टो स्वीकारण्याचे सर्वाधिक लोकही येथेच आहेत. कारण यामुळे लोक ऑनलाइन उथ्पन्नाचे नवे मार्ग शोधण्याचा तसेच त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचठिकाणी ते बिटकॉइन सारख्या जागतिक मालमत्तेत प्रवेश करतात, येथे जगाच्या कोणत्याही भागातून गुंतवणूक करता येते.         विशेष म्हणजे, अहमदाबाद, लखनौ, पाटणा यासारख्या टिअर २ शहरांमध्ये २९५०% वाढ झाली तर रांची, इंफाळ, मोहाली यासारख्या टिअर ३ शहरांनी वझीरएक्सवर २४५५५% ची सरासरी वृद्धीची नोंद केली.       वझीरएक्सचे सीईओ निश्चल शेट्‌टी म्हणाले, “क्रिप्टोमध्ये ग्रामीण भारतातील आर्थिक समस्या दूर करण्याची आणि भांडवल सहजपणे मिळवणे, जास्त ऑनलाइन नोकऱ्या उपलब्ध करण्याची प्रचंड क्षमता आहे. वझीरएक्स येथे, एक सुरक्षित क्रिप्टो इकोसिस्टिम तयार करणे, जी देशाला डिजिटल सशक्त समाज आणि ज्ञानवादी अर्थव्यवस्थेत रुपांतरीत करत डिजिटल इंडियाची मोहीम पुढे नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”        दरम्यान, निष्कर्षांमधील सर्वोत्तम घटकांपैकी एक म्हणजे टिअर २ आणि टिअर ३ शहरांतील महिलांची क्रिप्टोच्या समूहात कशी समाविष्ट झाली. या भागातील महिला देशातील एकूण महिलांच्या साइनअपपैकी ६५% आहे. वझीर एक्सने काही महिला ट्रेडर्सशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या की, क्रिप्टोने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात तसेच जीवनमान उंचावण्यास मदत झाली. तसेच कुटुंबासाठी दुय्यम उत्पन्नाचा मोठा स्रोतही जोडला गेला.

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांत टिअर २ आणि टिअर ३ शहरे अग्रेसर; महिलांचे प्रमाणही लक्षणीय क्रिप्टोकरन्सी व्यवहारांत टिअर २ आणि टिअर ३ शहरे अग्रेसर; महिलांचे प्रमाणही लक्षणीय Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads