Header AD

स्वातंत्र्य दिनी झाला '' आपला माणूस '' मोहिमेचा शुभारंभ वुई आर फॉर यु चे अध्यक्ष किरण नाकती यांची संकल्पना
ठाणे , प्रतिनिधी  :  वुई आर फॉर यु आणि नौपाडा युथ यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपला माणूस या मोहिमेचा शुभारंभ वुई आर फॉर यु चे अध्यक्ष किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला . या अंतर्गत ठाणे शहरातील मुख्य स्मशानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहर बाग स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्य्क वस्तूंच्या किट चे वाटप करण्यात आले .               करोना काळात गेल्या दीड दोन वर्षात स्मशान भूमीतील सर्वच बांधवांनी जीवावरचे संकट असून न डगमगता आपले कर्तव्य चोख बजावले आहे . त्यांच्या या कर्तव्याप्रती भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ' आपला माणूस ' मोहिमेअंतर्गत जीवनावश्य्क वस्तूंचे किट जवाहरभाग स्मशान भूमीतील बांधवांना वुई आर फॉर यु आणि नौपाडा युथ च्या वतीने देण्यात आले .           यावेळी वुई आर फॉर यु चे अध्यक्ष किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली वुई आर फॉर यु चे सेवेकरी विजय डावरे , महेश सुतार , ऋषिकेश केदार , अशोक कदम , रघुनाथ रसाळ , पांडुरंग पाटील , नौपाडा युथ चे गजानन परब , अक्षय जोशी  , आदित्य जाधव , अभिजित जाधव , अद्वैत मुळे आदी सहभागी झाले होते .          माणूस मरण पावल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार झाले कि त्याला मुक्ती मिळते असे बोलले जाते . त्यासाठी अनेक मंडळी ही रात्रंदिवस बॉर्डर वरील सैनिकांसारखी रात्रंदिवस स्मशानभूमीत कार्यरत असतात . या मंडळींनी कोरोना काळात ऍम्ब्युलन्स चालक , मृतदेह रॅप करणे  , अग्निसंस्कार करणे , अस्थी व्यवस्थित ठेवणे यासारखी विविध कामे चोख केली .        हे काम करण्यासाठी खूप मोठे जिगर लागते ती  त्यामुळे वुई आर फॉर यु आणि नौपाडा युथ च्या माध्यमातून  ७५ वा स्वातंत्र्यदिन 'जीवनावश्य्क वस्तू चे किट वाटप करून  खारीचा वाटा उचलण्यात आला . ''  ही मंडळी खूप मनापासून आपले कर्तव्य बजावत असतात . कोणाच्या आईसाठी , कोणाच्या वडिलांसाठी ही सर्व मंडळी सतत कार्यरत असतात . खरतर ही मदत नाही हे कर्तव्य आहे पण भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत '' . अशा भावना या वेळी बोलताना वुई आर फॉर यु चे अध्यक्ष किरण नाकती यांनी व्यक्त केले . 


चौकट


वुई आर फॉर यु संस्थेच्या  ' आपला माणूस  ' या मोहिमेअंतर्गत समाजातील दुर्लक्षित परंतु म्हण समाजकार्य करणाऱ्या घटकांना सहकार्य केले जाणार आहे . त्याची सुरुवात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना पुढील महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्य्क वस्तूंचे वाटप करून करण्यात आली .

स्वातंत्र्य दिनी झाला '' आपला माणूस '' मोहिमेचा शुभारंभ वुई आर फॉर यु चे अध्यक्ष किरण नाकती यांची संकल्पना स्वातंत्र्य दिनी झाला '' आपला माणूस '' मोहिमेचा शुभारंभ वुई आर फॉर यु चे अध्यक्ष किरण नाकती यांची संकल्पना Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads