Header AD

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची १८ ऑगस्ट रोजी जन आशिर्वाद यात्रा


"■कल्याणउल्हासनगर अंबरनाथ व बदलापूर येथे होणार स्वागत...


कल्याण , प्रतिनिधी   : केंद्र सरकारमधील नवनियुक्त केंद्रीयमंत्री १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान जन आशिर्वाद यात्रा काढणार असून केंद्रीय राज्यमंत्री  कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा १८ ऑगस्ट रोजी कल्याणउल्हासनगरअंबरनाथ व बदलापूर येथे निघणार आहे.या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनाबाबत आज कल्याणमधील आचिवर्स कॉलेजमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार संजय केळकरकिसन कथोरेयात्रा प्रमुख आमदार निरंजन डावखरेसहप्रमुख माजी आमदार नरेंद्र पवारमाजी मंत्री जगन्नाथ पाटीलआमदार महेश चौगुले तसेच सर्व मंडळ अध्यक्षविविध आघाड्यामोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जन आशिर्वाद यात्रेचा मार्ग तसेच इतर नियोजनाबाबत सुक्ष्म नियोजन करून पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.ही जन आशिर्वाद यात्रा कल्याण पश्चिमउल्हासनगरअंबरनाथ व बदलापूर मधील विविध भागातून जाणार असून मोदी सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचविण्यासोबतच जनतेचे आशिर्वाद घेतले जाणार आहे. या यात्रेत आत्मनिर्भर भारत रोजगार योजनापंतप्रधान जनधन योजनाप्रधानमंत्री उज्वला योजनाकौशल्य विकासपीक योजनाकृषि सिंचन योजनापंतप्रधान युवा योजना यासह केंद्र सरकारने अन्य गरीब कल्याणकारी योजना सुरू केल्या या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम या जन आशिर्वाद यात्रेतून केले जाणार आहे.केंद्र सरकारमधील ३९ नवनियुक्त  केंद्रीयमंत्री जन आशिर्वाद यात्रा काढणार असून २१२ लोकसभा क्षेत्रातून १९ हजार ५६७ किलोमीटर चा प्रवास करून केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे व जनतेचा आशिर्वाद घेण्याचे काम करणार आहे.


केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची १८ ऑगस्ट रोजी जन आशिर्वाद यात्रा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची १८ ऑगस्ट रोजी जन आशिर्वाद यात्रा Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads