Header AD

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे कल्याण वासीयां कडून जोरदार स्वागत


■केंद्रातील योजनांच्या लाभार्थ्यांनी मानले मोदी सरकारचे आभार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मोदी सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व जनतेचे आशिर्वाद घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशिर्वाद यात्रेचे कल्याणमध्ये जोरदार स्वागत झाले.जन आशिर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या यात्रेला सकाळी साडेनऊ वाजता कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकापासून सुरुवात झाली. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण केला. आगरी कोळी समाजातर्फे यावेळी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटीलआमदार निरंजन डावखरेगणपत गायकवाडकुमार ऐलानीभाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रेटिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईरयांच्यासह भाजपाचे नगरसेवकसर्व मंडळजिल्हा व प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुर्गाडी चौकातून जन आशिर्वाद यात्रा लालचौकी येथे आली तिथे प्रजपिता ब्रह्मकुमारीकडून केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सहजानंद चौकात युवा मोर्चातर्फे स्वागत करून स्किल इंडियाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपजेष्ठ नागरिक मंडळातर्फे स्वागत करून यात्रा शिवाजी चौकात पोहचली तिथे ३७० कलम हटविल्याबद्दल आभार मानण्यात आले व मुस्लिमजैन समाज तसेच व्यापारी संघटनेकडून कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वकील संघटना व हिंदू वाहिनी तर्फे सत्कार करण्यात आला. नेताजी सुभाष चौकात रेलचाईल्ड संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले व यात्रा सिंडिकेट येथे पोहचली याठिकाणी मराठाउत्तर भारतीयदक्षिण भारतीय समाजमहिला मोर्चा व गुरुद्वारा समितीतर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले. तर प्रेम ऑटो येथे डम्पिंग ग्राउंडवालधुनी नदीबाबत निवेदन देण्यात आले तसेच भाजपा शिक्षक आघाडीखान्देश समाजसिंधी समाज व आगरी कोळी उत्कर्ष मंडळातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले.या जन आशिर्वाद यात्रेत आत्मनिर्भर भारत योजनाकौशल्य विकासप्रधानमंत्री उज्वल योजनापंतप्रधान जनधन योजनापीक योजनाकृषी योजनापंतप्रधान युवा योजना यासह अन्य योजनेच्या लाभार्थ्यांची केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. जन आशिर्वाद यात्रेत युवकांची बाईक रॅली लक्ष वेधून घेत होती तर रस्त्याच्या दुतर्फा नागरिक जन आशिर्वाद यात्रेच्या रथावर पुष्पवृष्टी करीत होते.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे कल्याण वासीयां कडून जोरदार स्वागत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे कल्याण वासीयां कडून जोरदार स्वागत Reviewed by News1 Marathi on August 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads