Header AD

३५०फुटांवर रॅपलिंग द्वारे तिरंगा फडकवत शहिदांना दिली मानवंदना

   कल्याण , कुणाल  म्हात्रे  : स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत पॉईंट ब्रेक अॅडव्हेंचर्स  यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री खोऱ्यास साजेसा रांगडेपणा आणि राकटपणा साहसी गिर्यारोहकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या शितकडा धबधब्यावर तब्बल ३५० फुटांवर भारताचा तिरंगा ध्वज खांद्यावर घेऊन रॅपलिंगद्वारे कल्याणच्या गिर्यारोहक भूषण पवार यांनी सुरक्षित पणे भारताचा तिरंगा फडकवत देशातील शाहिद झालेल्या सैनिकांना ही मोहीम समर्पित केली.या मोहिमेची सुरुवात उंब्रडे गाव(ता. त्रिम्बकेश्वरजिल्हा नाशिक)येथून झाली. अर्ध्या तासाची पायपीट करून नदी पात्र ओलांडून शीतकडा धबधबा येतो आणि सुरू होतो. या मोहिमेचा खरा थरार पहिला १० फुटी खडकाळ टप्पा उतार झाल्यावर आणि कड्यावर आल्यावर दिसते ते मनात धडकी भरणारे शितकडा धबधब्याचे रौद्र रूप.
 अखेर ह्या सर्व आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात कल्याणचे  गिर्यारोहक भूषण पवार यांनी तिरंगा फडकवला. या मोहिमेचे श्रेय पॉईंटं ब्रेक ऍडव्हेंचरच्या जॉकी साळुंखे, चेतन शिंदे, अमोल तेलंग, सौरभ भगत आणि रुपा साळुंखे भगत यांना दिले.

३५०फुटांवर रॅपलिंग द्वारे तिरंगा फडकवत शहिदांना दिली मानवंदना ३५०फुटांवर रॅपलिंग द्वारे तिरंगा फडकवत शहिदांना दिली मानवंदना Reviewed by News1 Marathi on August 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads