Header AD

महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही अभिमाना स्पद गोष्ट महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी


■उपग्रह बनविण्याच्या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांचा केला गौरव....


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही एक मोठी व अभिमानास्पद गोष्ट आहेअसे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी महापालिकेच्या शाळातून 10 विदयार्थ्यांनी उपग्रह बनविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. या मुलांना आज प्रशस्तीपत्र देवून गौरवितांना पालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले.मुलांनी अभ्यासाबरोबरच क्रिडा क्षेत्रातही नैपुण्य मिळवावे व पुढील आयुष्यात प्रगती करावीअशा भरभरुन शुभेच्छा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना दिल्या. महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाहीअसे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, रामेश्वरमतामिळनाडू आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी सदर फाऊंडेशनचे सचिव मिलींद चौधरी यांनी मार्टिन ग्रुप या संस्थेमार्फत महापालिकेच्या महात्मा फुले प्राथमिक विदयालय,शाळा क्र.68बारावेबंदे अली खाँ महापालिका शाळा क्र. 99/12उर्दू बल्याणीतिसाई प्राथमिक विदयालयतिसगावमनपा शाळा क्र. 18,  मनपा शाळा क्र. 12उंबर्डेप्रबोधनकार ठाकरे मनपा शाळा क्र.19 नेतीवली या शाळातून 10 विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा मोहिमेत सहभागी करुन घेतले.डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत विदयार्थ्यांना उपग्रह बनविणेबाबत संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शन कण्यात आले होते. आणि दि. 19 जानेवारी2021 रोजी जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविदयालयहडपसरपुणे यांचेमार्फत उपग्रह बनविण्याची कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती. दि. 07 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम तामिळनाडू येथून 100 उपग्रह हेलियम बलूनद्वारे एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करण्यात आला.हे उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असून त्यासमवेत पॅराशुटजीपीएस ट्रकिंग सिस्टिम लाईव्ह कॅमेरा जोडलेला आहेत्यामुळे प्रत्यक्ष ओझोनकार्बन डायऑक्साईडहवेची शुध्दताहवेतील प्रदुषणहवेचा दाब आणि माहिती या उपग्रहामार्फत पृथ्वीवरील केंद्राना पाठवता येईल. या पेलोड सोबत काही झाडांच्या बिया सुध्दा पाठविल्या आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. अशाप्रकारे शालेय विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा उपक्रमामध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे विदयार्थ्यांमध्ये स्पेस संबंधित संशोधनाची आवड निर्माण होवून भविष्यात त्यांना करियर बनवितांना नक्की उपयुक्त ठरेल. या गौरव सोहळयासमयी उपआयुक्त शिक्षण अनंत कदमप्रशासन अधिकारी जे.जे. तडवीशिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे व संबंधित शाळांतील शिक्षक वर्ग विदयार्थ्यांसमवेत उपस्थित होता.

महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही अभिमाना स्पद गोष्ट महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही अभिमाना स्पद गोष्ट महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी Reviewed by News1 Marathi on August 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads