Header AD

ठाणे जिल्ह्याला बोगस कंत्राटदारांचा शाप – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ठाणे जिल्ह्यातील विकासाला विकासकामे करणाऱ्या बोगस कंत्राटदारांचा अडसर असून ठाणे जिल्ह्यातील कुठल्याच रस्त्यांचे काम दिलेल्या मुदतीच्या वेळेत पूर्ण होत नसून हा ठाणे जिल्ह्याला शाप असून कामासाठी नेमलेले कंत्राटदार बोगस असल्याचा आरोप केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.            केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्या नंतर प्रथमच ठाणे जिल्ह्यात आयोजित केलेल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात सोमवारी ठाणे शहरापासून सुरू झाल्या नंतर कल्याण पूर्वेतील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात सांगता झाली.यावेळी आमदार गणपत गायकवाड, किसन कथोरे, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे आदींसह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.   दरम्यान पत्रजकारांशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उतर देताना सांगितले की आरक्षणा बात केंद्र सरकारची भूमिका सकारात्मक असून राज्य घटनेत दुरुस्ती करून केंद्राने राज्याला अधिकार दिले असल्याने १०२ वया कलमाची दुरुस्ती मध्ये ओबोसी कमिशनला संविधानिक  दर्जा दिल्या नंतर जाती निहाय सूची तयार करण्याचे व आरक्षण देण्याचे राज्याला अधिकार होते. ते आपोआप अधिकार ओबोसी कमिशनला कडे गेले होते त्यामुळे महाराष्ट्र सरकार ने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले त्याच्या पाठीमागे सुप्रीम कोटाने जजमेंट देताना अशी बाजू सांगितली की राज्य सरकारला १०२ व्या घटना दुरुस्ती नंतर अधिकार राहिले नसून हे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत त्यामुळे हे आरक्षण रद्द करण्यात येत  आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी १२७ वी घटना दुरुस्ती करून मागच्या आठवड्यात लोकसभा व राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून राज्याचे जे अधिकार केंद्राकडे आले होते ते पुन्हा केंद्राचे अधिकार राज्याला देण्याचा कायदा दोन्ही सभागृहाने एकमताने मंजूर केला. ओबोसीच्या बिलावर दोन्ही सभागृहामध्ये रीतसर चर्चा होऊन या बिलाला सर्व पक्षाने संमती देऊन बिल मंजूर केले आहे. राज्याने आपल कमिशन नेमून जाती निहाय गणना करायची की ओबीसी,मराठा आणि इतर समाज यांची जनगनना करायची यांची कशी सूची तयार करायची यांचे सगळे अधिकार हे राज्याला नवीन कायदा करून दिलेला आहे  आता राज्याने या बाबतीतला निर्णय करावा व त्यासाठी राज्याने थोड्या दिवसापूर्वी कमिशन नेमले असल्याची माहिती दिली. कल्याण शिळ रस्त्याचे काम गेल्या अडीज वर्षा पासून सुरू असून दुरावस्थेने वेढलेल्या खड्डेमय रस्त्यातूनच जन आशीर्वाद यात्रा निघाली असताना खड्डेमय रस्त्यातून यावे लागल्याने रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत नाराजी व्यक्त केली. या रस्त्यांचे काम निष्कृष्ठ दर्जाचे झाले असल्याबाबत सर्वच पक्षांनी लक्ष वेधले होते. भाजपानेही या रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी केल्याने या रस्त्याच्या कामाची चौकशी केली जाईल. तसेच शहापूर कर्जत महामार्ग या रस्त्याचे काम निष्कृष्ठ दर्जाचे झाल्याचा निर्वाळा दिला.

ठाणे जिल्ह्याला बोगस कंत्राटदारांचा शाप – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील ठाणे जिल्ह्याला बोगस कंत्राटदारांचा शाप – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील Reviewed by News1 Marathi on August 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

गोवा येथील स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंचे यश

  कल्याण , कुणाल म्हात्रे  :   गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कल्याणच्या  खेळाडूंनी  अथलेटिक्स ,  फुटबॉल आणि क्रिकेट ...

Post AD

home ads