Header AD

चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या 3 पिल्लांचा केडीएमसी फायर ब्रिगेडने वाचवला जीव
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सोसायटीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांचा जीव  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवला. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली सोसायटीत आज सकाळी हा प्रकार घडला.


या सोसायटीच्या ड्रेनेज चेंबर्समध्ये कुत्र्याचे पिल्लू पडल्याची माहिती केडीएमसी फायर ब्रिगेडला सोसायटीतील रहिवाशांनी दिली. त्यानूसार केडीएमसी फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि या पिल्लाना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र चेंबरमधील अरुंद असणारी जागा आणि त्यात अडकलेल्या पिल्लाच्या ओरडण्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांचा जीवही कासावीस झाला होता. 
कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या  जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आणि आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून या कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केली. चेंबरमध्ये अडकलेल्या या पिल्लाला बाहेर काढण्यास आणखी थोडा जरी वेळ लागला असता या इवल्याशा पिल्लांच्या जीवावर बेतले असते अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.


चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या 3 पिल्लांचा केडीएमसी फायर ब्रिगेडने वाचवला जीव चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या 3 पिल्लांचा केडीएमसी फायर ब्रिगेडने वाचवला जीव Reviewed by News1 Marathi on August 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads