Header AD

भिवंडीत 10 किलो गांजा , 80 ग्रॅम सोन्याचे दागिन्यां सह दरोडा टाकण्या साठी आलेल्या आरोपी कडून रिव्हॉल्व्हर सह दोन जिवंत काडतुसे जप्त ,शांतीनगर पोलिसां कडून गुन्ह्यांची यशस्वी उकल

भिवंडी दि 11(प्रतिनिधी )शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कृत्य होत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली एकूण तीन गुन्ह्यांची उकल करीत दहा किलो गांजा ,एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुसां सह चोरीस गेलेला 80 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळविले आहे .              पो उप निरीक्षक रवींद्र पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत आमपाडा शानदार मार्केट येथे सोहेल शेख नामक व्यक्ती आपल्या साथीदारासह गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शानदार मार्केट येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या मोटारसायकल वरील थैलीत दोन पॅकेट मध्ये 2 लाख 7 हजार 800 रुपये किमतीचा 10 किलो 390 ग्रॅम गांजा व दुचाकी मोबाईल असा एकूण 2 लाख 57 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .               टेमघर येथील गोरखनाथ अंकुश म्हात्रे यांनी सार्वजनिक रस्त्यालगत आपल्या जवळील 90 ग्रॅम वजनाचे दागिने आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून दुचाकी उभी करून ठेवली असता आरोपी अनिल पाल याने सदर दुचाकी चोरी केली होती .या बाबत 2 लाख 15 हजार रुपयाच्या चोरी बाबत गुन्हा दाखल असताना पोलिसांनी तांत्रिक तपासा द्वारे माहिती मिळवून रांची रा.झारखंड येथून आरोपीस ताब्यात घेऊन 80 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.                 तर शांतीनगर भाजीमार्केट येथील मन्नत गोल्ड या सोने विक्री च्या दुकानात रात्री साडेनऊ वाजताच्या चांदीची अंगठी खरेदी करण्याचा बहाण्याने आलेल्या ग्राहकाने दुकानदार अंगठी दाखवीत असताना आपल्या जवळील रिव्हॉल्व्हर दुकानदाराच्या गळ्याला लावून त्या कडील सर्व दागिने चोरीचा प्रयत्न केला असता या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच गांभीर्य लक्षात घेऊन पो शिपाई श्रीकांत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस निशस्त्र करून आरोपीस ताब्यात घेत त्याच्या जवळून एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात यश मिळविले आहे .              पोलीस उपयुक्त योगेश चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत ,पो निरीक्षक किरणकुमार काबाडी ,नितीन पाटील ,विक्रम मोहिते यांच्या नेतृत्वखाली पो उप निरी रवींद्र पाटील,निलेश जाधव,बडगिरे ,पोलीस पथकातील शेळके ,चौधरी,वडे,इथापे, सैय्यद, वेताळ,काकड,मोहिते, जाधव,श्रीकांत पाटील ,इंगळे,पाटील,सानप या पथकाने ही कारवाई केली आहे .

भिवंडीत 10 किलो गांजा , 80 ग्रॅम सोन्याचे दागिन्यां सह दरोडा टाकण्या साठी आलेल्या आरोपी कडून रिव्हॉल्व्हर सह दोन जिवंत काडतुसे जप्त ,शांतीनगर पोलिसां कडून गुन्ह्यांची यशस्वी उकल भिवंडीत 10 किलो गांजा , 80 ग्रॅम सोन्याचे दागिन्यां सह दरोडा टाकण्या साठी आलेल्या आरोपी कडून रिव्हॉल्व्हर सह दोन जिवंत काडतुसे जप्त ,शांतीनगर पोलिसां कडून गुन्ह्यांची यशस्वी उकल Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads