Header AD

कोरोना काळात मानवतेसाठी बलिदान दिलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबासाठी चळवळ उभारावी – -डॉ. दामोदर नंदा




डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात मानवतेसाठी बलिदान दिलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबासाठी समाजाने चळवळ उभारावी असे प्रतिपादन सुप्रसिद्ध डॉ. दामोदर नंदा यांनी जागतिक डॉक्टर दिनानिमित्त बाज आर.आर.हॉस्पिटल येथे केले. डॉ. दामोदर नंदा यांनी वैद्यकीय क्षेत्रात ५० वर्ष पूर्ण केल्याबद्दल बाज आर.आर.हॉस्पिटल येथे जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला.



   यावेळी आर.आर.हॉस्पिटल संचालक डॉ.अमीर कुरेशी,डॉ.भरत तिवारी,जे.के.थाॅमस,डॉ.सुनील वानवे,डॉ.अमरीश नंदा यांसह हॉस्पिटल मधील डॉक्टर्स,परिचारिका आणि कर्मचारीवर्ग आदि उपस्थित होते.यावेळी डॉ. दामोदर नंदा यांचा उपस्थित डॉक्टरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.दामोदर नंदा म्हणाले,कोरोना काळात ज्या डॉक्टरांचे निधन झाले.त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अमुल्य होते.रुग्णांची सेवा करत या काळात अनेक डॉक्टर्स प्राणास मुकले.



   त्याच्या बद्दल समाजात आदराची भावना आहे.सरकारच्या वतीने अश्या डॉक्टरांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.म्हणून कोरोना काळात मानवतेसाठी बलिदान दिलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबासाठी समाजाने चळवळ उभारण्याच्या गरज आहे.डॉक्टरांनी रुग्णांची सेवा करताना स्वतःदेखील वेळ काढायला हवा.त्यामुळे कुटुंबाची जडणघडण योग्य प्रकारे होऊ शकते.


             

          टीमवर्क असेल तर डॉक्टरांना मोकळा वेळ मिळू शकेल.मोकळा वेळ डॉक्टर्स आपल्या कुटुंबाना देऊ शकेल.बाज आर.आर.रुग्णालयातील नव्या पिढीतील वैद्यकीय क्षेत्रातील तरुण डॉक्टर्स रुग्णांची सेवा करत आहे,अशी कौतुकाची थाप डॉ. नंदा यांनी यावेळी दिली.

कोरोना काळात मानवतेसाठी बलिदान दिलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबासाठी चळवळ उभारावी – -डॉ. दामोदर नंदा कोरोना काळात मानवतेसाठी बलिदान दिलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबासाठी चळवळ उभारावी – -डॉ. दामोदर नंदा Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads