Header AD

शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई


■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे....

 

ठाणे , प्रतिनिधी  : ठाणे महापालिकेच्यावतीने प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली. 


          

             या कारवाई तंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी अधिक ३ मजली इमारतीतील ४ थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. १, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. २०६ येथील रवि अच्युत पुजारी यांच्या ३२ × ५२ चौ. फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम आज जेसीबी मशीनच्या साहाय्याने निष्कासीत करण्यात आले.

        

         

            सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर व सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.


शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads