Header AD

ग्रामीण भागातील नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी


■नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली तहसीलदारांची भेट...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण परिसरात नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना या आपत्तीच्या काळात मदत म्हणून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे.कल्याण ग्रामीणमधील आडीवली ढोकळी प्रभागातील विजय दादा पाटील नगरऑस्टिन नगर गणेश चौकसिद्धिविनायक नगरन्यू फेज २- साई समर्थ नगर येथील रहिवाशांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे परिसरात पाणी साचल्याने इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे भाताचे पिक देखील वाहून गेले आहे. एकूणच झालेल्या या मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांचे झालेले नुकसान प्रशासनापर्यंत पोहचावे या हेतूने कुणाल पाटील यांनी अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांची भेट घेऊन  झालेल्या नुकसानाबद्दल  माहिती दिली.नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी पाटील यांनी केली असून लवकरच त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करुन प्रशासन नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on July 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पत्रकार कुणाल म्हात्रे गोल्डन प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित

  ■होप मिरर फाउंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात आला सन्मान कल्याण , प्रतिनिधी  :   नवी मुंबई परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या होप मिरर...

Post AD

home ads