Header AD

मोक्का मधून सुटलेल्या गुन्हेगारांची जेल वारी नंतर जल्लोषात मिरवणूक

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पाच वर्षांपूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या मोक्काच्या आरोपीला कल्याण तालुका पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली होती. आता हा सराईत गुन्हेगार  जेलमधून मोक्का मधून  सुटल्यानंतर त्याच्या साथी दारासह  जेलवारीनंतर त्याची जल्लोषात  मिरवणूक काढल्याचा प्रकार व्हायरल व्हिड़ीओमुळे समोर आला आहे.           गणेश श्रीपत म्हसकर आणि महेश मुन्ना पाल असे मोक्कामधून सुटल्यानतंर मिरवणूक काढण्यात आलेल्याची नावे आहेत. या मिरवणूक प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला.मोक्का मधील आरोपी गणेश श्रीपत म्हसकर आणि महेश मुन्ना पाल हे दोघेही कल्याण तालुक्यातील वरप गावात राहतात. गेल्या काही वर्षापसून या आरोपींच्या टोळीने कल्याण ग्रामीण भागात दशहत पसरवून गंभीर गुन्हे केले. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी ५ वर्षांपूर्वी मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करून त्यांची रवानगी कारागृहात केली होती. तेव्हापासून कारागृहात शिक्षा भोगत होते.बुधवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर म्हारळ ते वरप गावच्या दरम्यान तसेच वरप गावात रोडवर आधारवाडी कारागृह येथून जामीनावर सुटलेला आरोपी नामे गणेश श्रीपत म्हसकर व त्याचे साथीदार महेश पालफुलचंद जहाँ बिहारीमनीष म्हसकरभावेश देसलेसाहील देसले व इतर ३५ ते ४० नातेवाईक मित्रांनी त्यांच्या गाडया वाहतुकीस अडथळा व एखादयाच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने रोडवर उभ्या करुनबेकायदेशीर जमाव जमवुन फटाके वाजवुनमोठमोठयाने आरडा ओरडा करुन दहशतीचे वातावरण निर्माण केले.
 जिल्हा दंडाधिकारी ठाणे यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल पो हवा/ निकम यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २१ मे २०१५ साली फिर्यादी सुनील गंगाराम धुमाळ (३९) राहणार विठ्ठलनगरमनीषा पॅलेसम्हारळगाव हे व्यावसायाने कन्ट्रक्शन चा व्यवसाय करतात. त्यांनी मोहिली येथील पोतदार डेव्हलपर्स यांच्या जमीन सर्व्हे न.४०/२,,४ या जागेत बांधकाम करण्याचे काम घेतलेले होते.
 सदरील काम हे करू नये म्हणून आरोपी संतोष बाळू गोंधळेअनुप हरिश्चंद्र गोंधळे,पांडुरंग जनार्दन संतेगणेश श्रीपत म्हसकर,महेश मुन्ना पाल,जयकुमार उर्फ आकाश जितेंद्र भोईर व जॉट्टी उर्फ पिंट्या जयराम धुमाळ यांनी कट रचून गैरकायद्यांची मंडळी जमवून डस्टर गाडीचा पाठलाग जरून फिर्यादी सुनील धुमाळ यांच्यावर तीन पिस्टल मधून गोळ्या झाडल्या होत्या.  यातील फिर्यादी सुनील धुमाळ व साक्षीदार यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा कल्याण तालुका पोलीस ठाण्यात हत्यार कायदा कलम व संघटीत गुन्हेगार नियंत्रण अधिनियम नुसार मोक्का चा गुन्हा दाखल करून यातील सहा आरोपींना तत्कालीन पोलीस उप विभागीय अधिकारी व्हटकर यांनी अटक केली होती.

मोक्का मधून सुटलेल्या गुन्हेगारांची जेल वारी नंतर जल्लोषात मिरवणूक मोक्का मधून सुटलेल्या गुन्हेगारांची जेल वारी नंतर जल्लोषात मिरवणूक Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads