Header AD

आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यासाठी एनजीओंनी पुढे यावे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

 कल्याण, कुणाल  म्हात्रे  : आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यासाठी एनजीओंनी पुढे यावेअसे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. आजच्या आढावा बैठकीत महापालिकेकडे असलेल्या आरक्षित भूखंडांची माहिती त्यांनी घेतली आणि सदर भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांचा अवलंब करणेबाबत सुचना अधिकारी वर्गाला देतांना त्यांनी हे प्रतिपादन केले.महापालिकेने ताब्यात घेतलेले सुमारे ३४३ आरक्षित भूंखंड आहेतमहापालिकेच्या या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून भूखंडाच्या सभोवताली वृक्षारोपण करावे त्यासाठी इच्छुक एनजीओज(अशासकीय संस्था) यांची मदत घ्यावीकिंवा आरक्षित भूखंडाचा विकास होईपर्यंत मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन दयावेत आणि उत्तम खेडाळू घडविण्यासाठी या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांनी पुढे यावे.
अधिक माहितीसाठी महापालिकेशी संपर्क साधावाअसेही आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. तसेच महापालिकेच्या ताब्‍यातील आरक्षित भूखंडांभोवती वाडेभिंती किंवा तारेचे कुंपण घालून त्या संरक्षित कराव्यातअसे निर्देश त्यांनी प्रभागक्षेञ अधिकाऱ्यांना दिले.रस्ते स्वच्छ केले जात नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून प्रभागक्षेञ अधिका-यांनी रस्ते सफाईकडे स्वत: लक्ष पुरवावेत. त्याचप्रमाणे रस्ते साफ सफाईसाठी मायक्रो प्लानिंग करावेकचऱ्याचे ठिकाणे शोधुन तेथे नियमित साफ सफाई करावीस्वच्छता ही व्यवस्थित झालीच पाहिजेअसे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रभागक्षेञ अधिकाऱ्यांना दिले.पावसाळयातील दुर्घटना टाळण्यासाठी रहिवासमुक्त इमारती त्वरीत निष्कासित कराव्यात आणि सदर इमारती निष्कासित करण्यापूर्वी रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देणेबाबतचे आदेशही त्यांनी प्रभागक्षेञ अधिकाऱ्यांना दिले तसेच अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्याची कारवाई करावीअसेही निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.


आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यासाठी एनजीओंनी पुढे यावे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यासाठी एनजीओंनी पुढे यावे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी Reviewed by News1 Marathi on July 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads