Header AD

भिवंडीत महाराष्ट्र विधि मंडळाचे अधिवेशन लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप करीत भाजपाने केली निदर्शने

 भिवंडी दि 5(प्रतिनिधी )महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन ही लोकशाहीची थट्टा असून त्या विरोधात भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर निदर्शने करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला .


          दोन दिवसांच्या अधिवेशनात  राज्यासमोरील कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा ह्या अधिवेशनात होणार नाही. विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव देणे, लक्षवेधी सूचना मांडणे इत्यादी अधिकार रद्द केले आहेत त्यामुळे  जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे स्पष्ट झाल्याचा आरोप संतोष शेट्टी यांनी केला आहे .          महाविकास आघाडी सरकारने आता पर्यंत 7 अधिवेशने घेतली ज्यामध्ये फक्त 36 दिवस कामकाज घेतले.यातील कोविड काळातील अधिवेशने 4 आणि त्याचे दिवस 14. म्हणजे कोविड काळ नसताना सुद्धा 4 अधिवेशन आणि त्याचे दिवस 24 कामकाज झाले .लक्षवेधी सूचना प्रश्नोत्तरे अर्धा तास चर्चा घेण्यात येणार नाहीत. स्वीकृत झालेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे देता आली असती.            पण ते सारे प्रश्न रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, धान घोटाळा, कोरोनाचा विषय, बारा बलुतेदार यांचे प्रश्न असे कोणतेच प्रश्न मांडायचे नाहीत असे असणारे हे अधिवेशन जनतेची फसवणूक असून लोकशाहीची थट्टा असल्याचे स्पष्ट केले .
             शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात  नगरसेवक यशवंत टावरे ,सुमित पाटील ,नित्यानंद नाडार ,महिला अध्यक्षा ममता परमाणी , सरचिटणीस विशाल पठारे,प्रेषित जयवंत ,राजू गाजंगी यांसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
भिवंडीत महाराष्ट्र विधि मंडळाचे अधिवेशन लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप करीत भाजपाने केली निदर्शने भिवंडीत महाराष्ट्र विधि मंडळाचे अधिवेशन लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप करीत भाजपाने केली निदर्शने  Reviewed by News1 Marathi on July 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads