Header AD

कोरोना काळात आत्म हत्या केलेल्या सलून व्यावसायि कांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें कडे मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्य सरकारने कोरोना काळात टाळेबंदी सुरु केल्याने जनतेची आर्थिक स्थिती ढसळली आहे.आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. काही जण या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे तर काहीजण नैराश्य पोटी आत्महत्या करतात.        कोरोना काळात सलून व्यवसायिकांचेही हाल झाल्याने काही सलून व्यावसायिकांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. सलून अॅड ब्युटी पार्लर असोसिएशन सकल नाभिक समाज संघर्ष समितीने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र देऊन कोरोना काळात आत्महत्या केलेल्या सलून व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.राज्याच्या पावसाळी अधिवेशनात या मागणीबाबत लक्षवेधी सूचना मांडावी अशीही मागणी केली आहे.        महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळ ( बोर्ड ) कार्यान्वित करून अध्यक्ष तसेच कमिटी करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या सलून व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, सलून अॅड ब्युटी पार्लर व्यवसायिकांना कोरोना काळात सावरण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी,सलून अॅड ब्युटी पार्लर व्यवसायिकांना मोफत प्रशिक्षण व ट्रेनिंगसाठी राज्य सरकारकडून राज्यभर ट्रेनिंग सेंटर उभे करावेत अश्या मागणीचे निवेदन सलून अॅड ब्युटी पार्लर असोसिएशन सकल नाभिक समाज संघर्ष समितीने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्याची माहिती संस्थापक – अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी दिली आहे.       तर या निवेदना सोबत राज्यातील विविध शहरातील आत्महत्या केलेल्या सलून व्यवसायिकांचे नावे दिली आहेत.असोसिएशनचे संस्थापक – अध्यक्ष सोमनाथ काशीद, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते वाल्मिकी मोरे,मुंबई शहर अध्यक्ष दर्पण क्षीरसागर,नवी मुंबई विभाग अध्यक्ष केशव काळे,नवी मुंबई कार्याध्यक्ष रघुवीर पवार, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मुकंद धायरे.नवी मुंबई उपाध्यक्ष सुभाष पवार व ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब सवणे आदी शिष्ट मंडळाने सदर निवेदन दिले आहे. 

कोरोना काळात आत्म हत्या केलेल्या सलून व्यावसायि कांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें कडे मागणी कोरोना काळात आत्म हत्या केलेल्या सलून व्यावसायि कांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें कडे मागणी Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads