Header AD

भिवंडीत चौकशीसाठी आनलेला मुलगा मुलगी निघाल्यावर वर पोलिसही चक्रावले ;स्वतःच्या रक्षणासाठी ती बनली मुलगा..

भिवंडी दि 5 (प्रतिनिधी ) स्वतःच्या  रक्षणासाठी ती बनली मुलगा मागील आठ महिन्यापासून भिवंडीत मुलगा म्हणून करत होती वास्तव्य. गरीबीची परिस्थिती असल्याने पैसे कमवण्यासाठी ती पुण्याहून मुंबईला आली  मात्र काम न मिळाल्याने भिवंडीत दाखल झाली जे काही किरकोळ काम मिळेल ते करून  उदरनिर्वाह करत होती. जर काम मिळाला नाही तर इतरांनी केलेल्या मदतीने ती आपली भूक भागवत होती . 
        भिवंडीत तब्बल आठ महिन्यां पासून ती मुलगा म्हणून वावरत होती. छाया दशरथ माने वय 21 वर्ष असे या मुलीचे नाव आहे .घरची परिस्थिती गरिबीची असल्याने पैसे कमावण्याच्या उद्देशाने कोणालाही न सांगता तिने आपलं घर सोडलं व मुंबईत आली मात्र काम धाम न मिळाल्याने ती कामाच्या शोधत  भिवंडीत दाखल झाली परंतु लोकडाऊन असल्याने तिला काम काही मिळाला नाही .            तसेच  इमारतीच्या अढोशाळा ती झोपायची परंतु स्वतःचे रक्षण कसे करावे यासाठी तिने युक्ती लावली व बनली   मुलगा . स्वतः चे नाव तिने समीर शेख ठेवलं तसेच  स्वतःची  वेशभूषा देखील तिने बदललं व चाल ही मुलासारखं ठेवलं केस लहान केली त्यामुळे परिसरात कोणीही ओळखू शकला नाही परंतु लोकडाऊन च्या काळामध्ये शांतिनगर परिसरातून पोलिस गस्त घालत असताना एका मुलावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्या कडे  विचारपूस करायला सुरुवात केली. 
            परंतु समाधान कारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी या मुलाला पोलीस ठाण्यात आणले व त्या ठिकाणी चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा  सत्य समोर आलं की तो मुलगा नसून ती मुलगी आहे हे समजल्यावर पोलीस ही अक्षरशः चक्रावले. पोलिसांनी तिच्या कडून माहिती काढत तिचा घरचा पत्ता घेतला.
             तेंव्हा तिने सांगितले की ती पुणे ,हडपसर परिसरात राहत असून तिचे खरे  नाव छाया माने आहे तिच्या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्यांना समजले का मागील आठ महिन्यापासून ही मुलगी बेपत्ता आहे व त्यासंदर्भात गुन्हा देखील नोंद करण्यात आली आहे तेव्हा पोलिसांनी दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्या आई-वडिलांना भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यात बोलावून या मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. 
भिवंडीत चौकशीसाठी आनलेला मुलगा मुलगी निघाल्यावर वर पोलिसही चक्रावले ;स्वतःच्या रक्षणासाठी ती बनली मुलगा.. भिवंडीत चौकशीसाठी आनलेला मुलगा मुलगी निघाल्यावर वर पोलिसही चक्रावले ;स्वतःच्या  रक्षणासाठी ती बनली मुलगा.. Reviewed by News1 Marathi on July 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads