Header AD

फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भुषण जाधव बिनविरोध
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध असलेली फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक भूषण जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने फळेगाव पंचक्रोशीतील गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.      शुक्रवारी फळेगाव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून स. रा. भांगे तसेच सेवा सोसायटीचे सचिव भानुदास कोंडे होते. चेअरमन पदासाठी भूषण जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाची छाननी करून चेअरमनपदी भूषण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. फळेगाव सेवा सोसायटीचे सदस्य सुदाम पाटीलराजाराम चौधरीदिनेश जाधवआनंता जाधवआत्माराम तारमळेसुनील जाधवदर्शना जाधवसुनंदा देसेकर हे आहेत. फळेगाव सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन भूषण जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणेकल्याण पंचायत समितीचे सदस्य रमेश बांगरफळेगाव गाव कमिटीचे अध्यक्ष गोपाळ जाधवपोलिस पाटील प्रकाश जाधवबंचू बांगरचिमा भोईरजगन जाधवउपतालुका प्रमुख बंधू जाधवमाजी सभापती मिनाक्षी जाधव, चंद्रकांत भोईर यांच्यासह सेवा सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भुषण जाधव बिनविरोध फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भुषण जाधव बिनविरोध Reviewed by News1 Marathi on July 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads