Header AD

सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास "एक झाड माणुसकीचं ,एक पाऊल परिवर्तनाचं" ही मोहीम घेऊन निघाला सिद्धार्थ गणाई

भिवंडी दि 28 (प्रतिनिधी)  रायगड  किल्ल्यावर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला  अभिवादन करून अंधेरी येथील भवन महाविद्यालयातील  टी.वाय. बीएस.सी मध्ये शिकत असणारा  सद्या बापगाव मैत्रिकुल येथे  राहणारा सिद्धार्थ गणाई भर पावसात रायगड  ते सर्वोच्च शिखर
माउंट एव्हरेस्ट (सागर माथा)  हे  दोन हजार किलोमीटरचे अंतर तो  चालत पार करण्यासाठी २० जुलै २०२१ पासून तो निघाला  आहे. तर आज त्याच्या प्रवासाला ९ दिवस पूर्ण झाले आहेत.        ''एक झाड माणुसकीच'' ,''एक पाऊल परिवर्तनाच'' हा  सामाजिक उपक्रम राबिवत सिद्धार्थ गणाई  सामाजिक संदेश देत हिमालयाच्या वाटेने निघाला आहे. आज भिवंडी  तालुक्यातील पडघा नाशिक महामार्गाच्या दिशेने सिद्धार्थ गणाई प्रवास करताच पडघा येथील  युवा कवी मिलिंद जाधव यांनी  सिद्धार्थ गणाई याचे स्वागत करून एक झाड लावून ''एक झाड माणुसकीच'' ,''एक पाऊल परिवर्तनाच'' हा  सामाजिक उपक्रमात सहभागी झाले व त्याला  पुढील प्रवाससाठी शुभेच्छा दिल्या.            निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवी जीवनावर येण्याचं मूळ कारण आपणच आहोत. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे पण आपणच आहोत. यासाठी मी एक हा छोटा प्रयत्न करत आहे. आपण सगळे माझ्या सोबत आहात हीच माझी ताकद आहे. पाच वर्षाआधी मी छोटंस स्वप्नं घेऊन निघालो होतो.की हिमालायच्या  माउंट एव्हरेस्ट शिखरावर असल पाहिजे, परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते मला कधीच शक्य झाले नाही.            पण मी स्वप्न सोडले नाही. तर मी एक जिद्द घेऊन पुढे निघालो आहे. प्रवास माझा खडतर आहे. पण तुम्ही सगळे माझ्या सोबत असाल तर असंख्य झाडे आपण लावू शकतो मोहीम  व माझे स्वप्नं देखील पूर्ण होईल. तसेच मी जेव्हा  तुम्हाला  रस्त्यामध्ये दिसेल तर एक झाड लावून उपक्रमात सहभागी व्हा.माझी रहाण्याची व जेवणाची छोटीसी सोय आपण करावी. तुमच्या सहकार्याने  माझे ध्येय व  उपक्रम पूर्ण  होईल  असे यावेळी  सिद्धार्थ गणाई यांनी बोलताना सांगितले.
सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास "एक झाड माणुसकीचं ,एक पाऊल परिवर्तनाचं" ही मोहीम घेऊन निघाला सिद्धार्थ गणाई सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास "एक झाड माणुसकीचं ,एक पाऊल परिवर्तनाचं" ही मोहीम घेऊन निघाला  सिद्धार्थ गणाई Reviewed by News1 Marathi on July 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads