Header AD

कच्च्या तेलाचे दर मागील आठवड्यात ३ टक्क्यांनी वाढले
मुंबई, ५ जुलै २०२१ : कच्च्या तेलाचे दार मागील आठवड्यात ३ टक्क्यांनी वाढले. अमेरिकी क्रूड साठ्यात घसरण आणि अर्थव्यवस्था सुरू होत आहेत. जागतिक तेलाच्या मागणीत निरंतर सुधारणा होत असल्याचे हे संकेत असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.अमेरिकेतील एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, मागील आठवड्यात अमेरिकी क्रूड साठ्यात ६.७ दशलक्ष बॅरलची घट झाली. ही घट बाजाराच्या अपेक्षेनुसार ४.२ एवढीच होती. मात्र तोही आकडा घसरणीने पार केला. परिणामी सलग सहाव्या आठवड्यात तेलाच्या दरात घट दिसून आली.ओपेक अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज आणि सदस्यांदरम्यान ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान दोन दशलक्ष बॅरल प्रतिदिन उत्पादन वाढवण्यावर तात्पुरता करार झाला. त्यानंतर तेलाचे दर वाढले. 


मात्र यूएई येथील प्रमुख सदस्यांनी एप्रिल २०२२ नंतर उथ्पादन कपात कमी करणे आणि उत्पादन वाढवण्यावर आक्षेप घेतल्याने तेलातील नफ्याला पुन्हा माघार घ्यावी लागली. दरम्यान, ओपेक बैठकीतील निष्कर्षाची प्रतीक्षा गुंतवणूकदार करतील. डेल्टा व्हेरिएंट संक्रमित रुग्णसंख्येत वाढ दिसल्याने आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील कठोर निर्बंधांमुळे पुढील आठवड्यातही तेलाच्या दरांबाबत खबरदारी बाळगली जाईल..

कच्च्या तेलाचे दर मागील आठवड्यात ३ टक्क्यांनी वाढले कच्च्या तेलाचे दर मागील आठवड्यात ३ टक्क्यांनी वाढले Reviewed by News1 Marathi on July 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads