Header AD

भिवंडीत रस्त्या वरील खड्डे भरून साजरा केला मंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस

भिवंडी दि 5 (प्रतिनिधी ) प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त ठाणे जिल्हाध्यक्ष प्रेम प्रधान व शहराध्यक्ष राजेश गोडा यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून अभिनव पद्धतीने साजरा केला .              भिवंडी शहरात रस्त्यावरील खड्डे ही नेहमीची समस्या बनून राहिली असून त्यामुळे नागरीक त्रस्त असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिवंडी मुख्यालय येथ पासून आयजीएम हॉस्पिटल ,हसीन सिनेमा ,काप आळी या रस्त्यावरील खड्डे विटा रॅबिट आदी साहित्य वापरून बुजविण्यात आले .                 जिल्हाध्यक्ष प्रेमजी प्रधान, शहराध्यक्ष
राजेश गोडा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हा सचिव विशाल कुलकर्णी ,जिल्हा संघटक
रक्षक म्हात्रे,महिला शहराध्यक्षा सौ. शुभांगी बोगा,सल्लागार विनोद हरकर 
यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व घरेलू कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.
भिवंडीत रस्त्या वरील खड्डे भरून साजरा केला मंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस भिवंडीत रस्त्या वरील खड्डे भरून साजरा केला मंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस Reviewed by News1 Marathi on July 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads