Header AD

लसीकरण केंद्र वाढवून छोट्या व्यापा-यांना दिलासा देण्याची राष्ट्रवादीची मागणी


■राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र वाढवून छोट्या व्यापा-यांना दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी कल्याण डोंबिवली शहरात लसीकरणाच्या बाबतीत अनेक नागरिक वंचित असूनशहरात लसीकरण केंद्र तातडीने वाढवण्याबाबत आयुक्तांकडे मागणी केली.त्यावेळी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी लवकरच नवीन लसीकरण केंद्र आणि मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळास दिलेले आहे. त्याचप्रमाणे मोबाईल व्हॅन शहरातील स्लम भागातील नागरिक व जेष्ठ नागरिकांसाठी फिरते लसीकरण केंद्र उपयोगी ठरणार असल्याने त्याबाबत तातडीने कार्यवाही होण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे लहान व्यावसायिकांचे संचारबंदीमुळे अतोनात हाल होत असूनहातावर पोट असणा-या व्यापा-यांचे अगोदरच कंबरडे मोडलेले असतानात्यांना दिलासा मिळावा यासाठी शनिवार रविवार दोन्ही दिवस किंवा किमान एका दिवसा तरी दुकाने सुरु ठेवण्याची आपण परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदेकार्याध्यक्ष वंडार पाटीलविधानसभा अध्यक्ष डोंबिवली सुरेश जोशीकल्याण पश्चिम संदीप देसाईकल्याण पूर्व अर्जुन नायरकल्याण ग्रामीण दत्ता वझेकार्याध्यक्ष कल्याण पश्चिम उदय जाधवकल्याण पूर्व शरद गवळी उपस्थित होते.

लसीकरण केंद्र वाढवून छोट्या व्यापा-यांना दिलासा देण्याची राष्ट्रवादीची मागणी लसीकरण केंद्र वाढवून छोट्या व्यापा-यांना दिलासा देण्याची राष्ट्रवादीची मागणी Reviewed by News1 Marathi on July 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads