Header AD

सुशोभि करण, स्वच्छता व रस्ते दुरुस्ती कामाची महापौर आणि महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

 

■शहरातील सुशोभिकरण, स्वच्छता व फुटपाथ दुरुस्ती कामाची पाहणी करताना महापौर नरेश गणपत म्हस्के सोबत नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा सौ. नम्रता फाटक, महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आदी.....


ठाणे , प्रतिनिधी   ;   ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात सुरु असलेल्या सुशोभिकरण, स्वच्छता व फुटपाथ दुरुस्ती कामाची आज महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी यांनी पाहणी करून रस्त्याच्या बाजूला असणारी लहान झाडे-झुडपे तात्काळ तोडण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले.



       आज सकाळी महापौर नरेश गणपत म्हस्के आणि अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी यांनी आनंदनगर येथून सुशोभिकरण, स्वच्छता व रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. यावेळी नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा सौ. नम्रता फाटक, उप आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.



       या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी आनंदनगर परिसरातील साफसफाई, रंगरंगोटी, तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली. यावेळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रस्त्याच्या बाजूला साचलेला कचरा, माती, झाडांच्या पडलेल्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश देतानाच रस्त्याच्या बाजूला असणारी लहान झाडे-झुडपे तात्काळ तोडण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी संबंधित विभागास दिले.

सुशोभि करण, स्वच्छता व रस्ते दुरुस्ती कामाची महापौर आणि महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी सुशोभि करण, स्वच्छता व रस्ते दुरुस्ती कामाची महापौर आणि महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी Reviewed by News1 Marathi on July 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads