Header AD

केवणी दिवेतील विकास कामांचे कपिल पाटील यांच्या कडून लोकार्पण
भिवंडी, दि. ३ (प्रतिनिधी) : तालुक्यातील केवणी दिवेतील विकास कामांचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. केवणी दिवेतील जनतेला नागरी सुविधा देण्यासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचे खासदार कपिल पाटील यांनी नमूद केले.         
            माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने केवणीदिवे ते कोपर मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. 
              या रस्त्याच्या कामाबरोबरच केवणी दिवे ते कोपर रस्त्याच्या उर्वरित भागाचे ८० लाख खर्चून केलेले काम, जिल्हा परिषदेच्या केवणी दिवे शाळेत पत्राशेड व शाळेभोवती संरक्षण भिंत, ५० लाख खर्चून अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटी करण, दिवे गावातील अंतर्गत तलावापासून स्मशानभूमीपर्यंतचा ५० लाखांचा रस्ता आदी कामांचे आज लोकार्पण करण्यात आले.या वेळी माजी सभापती सपना राजेंद्र भोईर, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंत पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, पंचायत समिती सदस्या उज्वला राम भोईर, ललिता प्रताप पाटील, कोपरचे सरपंच रमेश पाटील, दिवेचे सरपंच रवींद्र भोईर, उपसरपंच सुमन पाटील, केवणीच्या सरपंच किर्ती पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती पाटील, राजेंद्र भोईर आदींची उपस्थिती होती.           केवणी दिवे गावाच्या लोक संख्येत दिवसें दिवस वाढ होत आहे. त्याच बरोबर नागरी सुविधा पुरविण्याचे आव्हानही आहे. मात्र, सर्व सुविधा पुरविण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे. त्यातूनच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील गावांमध्ये कॉंक्रिट रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता. त्यातूनच केवणीदिवेतील रस्त्याचे काम सुरू होत आहे, असे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले.
केवणी दिवेतील विकास कामांचे कपिल पाटील यांच्या कडून लोकार्पण केवणी दिवेतील विकास कामांचे कपिल पाटील यांच्या कडून लोकार्पण Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads