Header AD

सामाजिक कार्य कर्ते महेश ऐगडे यांच्या वतीने आरोग्य शिबीर


■२६४ आदिवासी व आश्रमातील २५ बालकांनी घेतला शिबीरचा लाभ...कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  टिटवाळा येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते महेश ऐगडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कल्याण तालुक्यातील म्हस्कल येथे आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. याचा लाभ येथील २६४ आदिवासीं व पारस बाल आश्रमातील २५ बालकांनी घेतला. यावेळी ऐगडे यांनी एका आदिवासी महिलेला मंगळसूत्र देखील भेट दिले.सतत काही ना काही समाज कार्य करणेगोरं गरीबांना मदतीचा हात देणेसामाजिकशैक्षणिक व धार्मिक कार्याला नेहमी सहकार्य करणेविविध समाजोपयोगी कार्यक्रमशिबीरांचे आयोजन करणे ही महेश ऐगडे यांची खुबी बनली आहे. कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात दिला. या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील म्हस्कल गावातील आदिवासी वाडीतील लोकांसाठी ऐगडे यांनी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराचा लाभ येथील २६४ आदिवासींनी व पारस आश्रमातील २५ बालकांनी घेतला.         यावेळी महिलापुरूष व लहान बालके यांच्या विविध तपासण्या केल्या व त्यांना गोळ्याऔषधे देखील देण्यात आली.  डॉ. अनुदुर्ग ढोणी(एम बीबीएस डीजीओएमडी)स्त्री रोग तज्ञ डॉ. उज्वला ढोणी (एमएएमएस) गोल्ड मेडल प्राप्तबाळरोगतज्ञ डॉ. राज जाधव व त्यांची टिम यांनी शिबिरासाठी काम पाहिले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अमोल आरूअमोल पाटीलआकाश गुंजाळसुरंज सिंगअशोक चौरे व वासुदेव वाघे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक कार्य कर्ते महेश ऐगडे यांच्या वतीने आरोग्य शिबीर सामाजिक कार्य कर्ते महेश ऐगडे यांच्या वतीने आरोग्य शिबीर Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads