Header AD

ॲड.प्रकाश लब्धे लिखित नाते जडले प्रवासाशी या पुस्तकाचे प्रकाशन

डोंबिवली ( शंकर जाधव ) ॲड.प्रकाश लब्धे यांची सारी पुस्तके वर्णन वाचकाला मोठा फेरफटका पुस्तकातुन घडवतात.सोबतची चित्रे  पुस्तकाच्या माहितीचिच नव्हे तर देखणेपणातही भर घालतात.आशा शब्दात विख्यात साहित्यिक डॉ .विजयाताई वाड यांनी  गौरविलेल्या ॲड.प्रकाश लब्धे लिखित नाते जडले प्रवासाशी या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा दादर येथील साने गुरुजी विद्यालय येथे पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन मोहन राम मोहाडिकर यांच्या हस्ते झाले.         तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाक्ष कृष्णा महाले होते.व्यासपिठावर ॲड.देवेंद्र यादव ॲड प्रकाश मोकाशी, विजय परदेशी आणि प्रमोद पवार उपस्थित होते.यावेळी मान्यवरानी पुस्तका बद्दल आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. साहित्यिक सत्यवान तेंटाबे .ॲड राजा ठाकरे, केसरी टुरच्या आदि मान्यवरांच्या शुभसंदेशाचे वाचन करण्यात आले.तर प्रकाशन सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रकाश लब्धे यांनी मी शिक्षक ते लेखक कसा झालो.
            तसेच प्रवासातील ठराविक ओढावले प्रसंग सांगितले .तसेच लेखन करण्यासाठी प्रोत्साहन करणाऱ्या मित्र परिवार नातेवाईक यांचे आभार मानुन अजुन काही दिवसांत पाच पुस्तके प्रकाशित करणार असल्याचे सांगितले .आज विकल्या जाणाऱ्या पुस्तकाची रक्कम पुर आलेल्या गावातील नागरिकांना करणार असल्याचे सांगितले .या कार्यक्रमाच्या  सुत्रसंचालनची जबाबदारी  प्रमोद पवार यांनी सांभाळली तर याप्रसंगी ॲड.जयश्री देवेंद्र यादव यांनी आभार मानले.
ॲड.प्रकाश लब्धे लिखित नाते जडले प्रवासाशी या पुस्तकाचे प्रकाशन ॲड.प्रकाश लब्धे लिखित नाते जडले प्रवासाशी या पुस्तकाचे प्रकाशन Reviewed by News1 Marathi on July 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads