Header AD

रिपाइं एकतावादीचे राजाभाऊ चव्हाण यांचे शोले स्टाईल आंदोलन
ठाणे,  प्रतिनिधी  :  गेल्या काही दिवसां पासून कोरोनाचे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधा मुळे चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणार्‍या गटई कामगारांची उपासमार होत आहे. यासाठी गटई कामगारांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी , या मागणीसाठी रिपाइं एकतावादीचे नेते भय्यासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हाध्यक्ष राजभाऊ चव्हाण यांनी शोले स्टाईल आंदोलन केले.           लॉकडाऊन मुळे विविध समाज घटकांवर विपरीत परिणाम झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या वर्गाची मोठया प्रमाणात उपासमार होत आहे. ठाणे शहरात रस्त्याच्या कडेला चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणारे चर्मकार या लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागले आहेत. या गटई व्यवसायाला निर्बंधामधून वगळावे , या मागणीसाठी राजाभाऊ चव्हाण यांनी अनेकवेळा ठामपाशी तसेच जिल्हाधिकार्‍यांशी पत्रव्यवहार केला आहे.        तसेच शहरातील विकास प्रकल्पां  मुळे बाधीत झालेल्या गटई कामगारांच्या स्टॉलचे स्थलांतरीत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. मात्र या दोन्ही मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने राजाभाऊ चव्हाण यांनी कोपरीतील आनंद टॉकीज समोर बांधण्यात येणार्‍या सॅटीस पुलाच्या पिलरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. सुमारे दोन तासभर त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले होते.

रिपाइं एकतावादीचे राजाभाऊ चव्हाण यांचे शोले स्टाईल आंदोलन रिपाइं एकतावादीचे राजाभाऊ चव्हाण यांचे शोले स्टाईल आंदोलन Reviewed by News1 Marathi on July 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads