Header AD

दलित मुस्लिम मराठा आणि ओबीसिंच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानात एल्गार


दलित आदिवासी मागासवर्गीयांचे हक्काचे पदोन्नती मधील आरक्षण त्वरित द्या - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले...मुंबई दि. 6  :  दलित आदिवासी इतर मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील  हक्काचे आरक्षण त्वरित देण्यात  यावे; राज्यात वाढत असलेले  दलित अत्याचार रोखावेत; मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे; मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये  5 टक्के  आरक्षण द्यावे;            ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील  राजकीय आरक्षण पूर्ववत करावेत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत यासह अनेक मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आज आझाद मैदान येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एल्गार पुकारत महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.          यावेळी नाशिकमधील ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली.नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यास रिपाइं चा पाठिंबा आहे. असा पुनरुच्चार ना रामदास आठवले यांनी केला.          या निदर्शनाचे आयोजन रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे केले. त्यांनी गनिमिकाव्याने व्यहरचना करीत आझाद मैदानात रिपाइंचे शेकडो कार्यकर्ते उतरविले. या निदर्शनास येणाऱ्या रिपाइं कार्यकर्त्यांना अनेक भागात मुंबई पोलिसांनी अटकाव केला होता.त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात मोठ्या कौशल्याने रिपाइं चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहिले.        राज्यात दलित अत्याचार वाढत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चोतोडा गावात हिवराळे परिवारावर झालेला हल्ला अत्यंत अमानुष होता या हल्ल्याचा तीव्र निषेध ना रामदास आठवले यांनी यावेळी केला. दलित अत्याचार झालेल्या गावात बुलडाणा चे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाऊन चिथावणीखोर जातीवादी भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा निषेध करीत संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे. 


  

           यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ; माजी आमदार सुमंतराव गायकवाड;  काकासाहेब खांबळकर; जगदीश गायकवाड;  दयाळ बहादुरे श्रीकांत भालेराव;सिद्धार्थ कासारे; विवेक पवार;  हरिहर यादव; ऍड आशा लांडगे शिलाताई गांगुर्डे; अनिल गांगुर्डे; अभया सोनवणे; सोना कांबळे;संजय पवार ; नंदू साठे; विजय साबळे सुमित वजाळे; रतन अस्वारे आदी अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दलित मुस्लिम मराठा आणि ओबीसिंच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानात एल्गार दलित मुस्लिम मराठा आणि ओबीसिंच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचा आझाद मैदानात एल्गार Reviewed by News1 Marathi on July 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads