Header AD

करोडोंचे सिटी पार्क गेले पाण्यात
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  ऊबंर्डेबारावे घनकचरा प्रकल्प, मोहेली उदंचन केंद्रासह  कल्याण पश्चिम मधील गौरीपाडा येथील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातुन करोडो रुपये खर्च करुन बांधकाम चालु असलेल्या सिटी पार्क मध्ये पुराचे पाणी शिरल्याने या प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे. गौरीपाडा पश्चिमेत सुरू असलेला सुमारे १२५ कोरोड रूपये खर्च अपेक्षित असलेला सिटी पार्क हा मनपाचा ड्रीम प्रोजेक्ट सलग दुसर्या वर्षी पाण्याखाली गेल्याने हा प्रकल्प वादाच्या भोवार्यात सापडला आहे. 


वालधुनी नदी, उल्हास नदी  संगम तसेच कल्याण बारावे खाडी नजीक असलेल्या सिटी पार्क प्रकल्प लो लाईन परिसरात सुरू असल्याने  पूरपरिस्थितीचा फटका या प्रकल्पा बसत आहे. या प्रकल्पा अंतर्गत सिटी पार्क येथे वालधुनी नदीला सरंक्षक भिंत बांधण्यात येत असली तरी बारावे खाडीचा हा पाण्याचा कँच्मेन्ट परिसर असल्याने येथे पाणी भरणार असे येथील जुन्या जाणत्याचे म्हणणे आहे. सलग दुसऱ्यादा सिटी पार्क परिसरात पुराचे पाणी शिरल्याने या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागाराने कोणत्या निकषाद्वारे प्रकल्प करण्याचा सल्ला दिला असा सवाल जाणकार करीत आहेत. वालधुनीनदी उल्हास नदीला येऊन मिळते त्या गौरीपाडा परिसरातील सखल भाग योगीधामभवानीनगरअनुपम नगरया भागांना पुर परिस्थितीचा सामाना करावा लागत असल्याने योगीधाम परिसरातील वालधुनी नदी संवर्धन समिती नदी स्वच्छतेसाठी पाठपुरावा करीत आहे. सिटी पार्कच्या कामामुळे होणाऱ्या भरावाचा फटका बसत असल्याचा आरोप रहिवाशी करत आहेत.      केडीएमसीने झोपेचे सोंग घेतले असून यामुळेच भवानीनगरघोलप नगर, अनुपम नगर, शिव अमृत धाम,  अमृत धामविधि कॉम्प्लेक्स, कैलास गार्डनयोगीधाम येथे पाणी भरले व घाण पाण्याचे बेट तयार झाले. परिसरात  स्मार्ट सिटी अंतर्गत महत्वकांक्षी प्रकल्प  सिटी पार्कच्या निमित्ताने जो अतिरिक्त भराव टाकला गेला व इतरही काही कारणाने वृंदावन व कैलास गार्डन यांच्या मधील नाला बुजवण्यात आला या सर्व कारणांमुळे आज योगीधाम पाण्यात जाऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  ग्राउंड फ्लोअरला राहणारे लोक बेघर झाले असून  घरातील सामानाचे नुकसान झाले आहे.            कोणतीही चूक  नसताना नागरिकांना हे सर्व सहन करावे लागत आहे. या सर्व परिस्थितीला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्या पुष्पा रत्नपारखी यांनी केला आहे.  दरम्यान दरवर्षी याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे करोडो रुपये खर्च करुन सिटी पार्क सुशोभिकरण करणे किती योग्य आहे याचा पुनर्विचार महापालिका प्रशासनाने करण्याची गरज असल्याची मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलचे प्रविण मुसळे यांनी केली आहे. 

करोडोंचे सिटी पार्क गेले पाण्यात करोडोंचे सिटी पार्क गेले पाण्यात Reviewed by News1 Marathi on July 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads