Header AD

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी, शिक्षणा धिकाऱ्यांना दिले निवेदन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा करून दखल घेण्यात आली नाही. म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने  जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन राज्यव्यापी आंदोलन केले. ठाणे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. वर्क फ्रॉम होम करत असलेल्या शिक्षकांनी काळ्या फिती लावून घरी काम केले तर शाळेत आलेल्या शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. ठाणे शिक्षणाधिकारी तसेच  जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी गुलाबराव पाटीलहेमलता मुनोतएकनाथ दळवीभुवनेश कुंभार व देवराज राऊळ  यांनी विविध एकतीस मागण्यांचे निवेदन दिले. तसेच कल्याण येथील गट शिक्षणाधिकारी यांना विजय भामरेदत्तात्रय गीतेराजेंद्र दळेविकास चव्हाणविठ्ठल राहुलआप्पाराव कदम व जनार्दन पाटील यांनी निवेदन देऊन निषेध नोंदविला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी, शिक्षणा धिकाऱ्यांना दिले निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी, शिक्षणा धिकाऱ्यांना दिले निवेदन Reviewed by News1 Marathi on July 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads