Header AD

'जंक फूड'च्या आहारी न जाता स्वदेशी आणि ताजे अन्न ग्रहण करा अन् स्वस्थ रहा- वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

 

■विदेशी जंक फूड : पोषण कि आर्थिक शोषण ?' या विषयावर विशेष संवाद...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आरोग्याला हानीकारक 'जंक फूड'च्या आहारी न जाता स्वदेशी आणि ताजे अन्न खाऊन स्वस्थ रहाअसे आवाहन 'आयुष मंत्रालया'चे राष्ट्रीय गुरु वैद्य सुविनय दामले यांनी केले. ते 'राष्ट्रीय चिकित्सक दिना'च्या निमित्ताने 'आरोग्य साहाय्य समिती'च्या वतीने आयोजित 'विदेशी जंक फूड  पोषण कि आर्थिक शोषण ?'             या ऑनलाईन विशेष संवादात बोलत होते. हा कार्यक्रम समितीच्या Hindujagruti.org या संकेतस्थळाद्वारेतसेच यू-ट्यूब आणि ट्वीटर यांद्वारे ३,०३३ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.       जंक फूडला आयुर्वेदात विरुद्धअन्न  म्हटले आहे. सरबतनारळ पाणी यांसारखे भारतीय पेय पिण्याऐवजी आरोग्याला हानीकारक असणार्‍या कोल्ड्रिंक्स्च्या आहारी आपण जात आहोत. मॅगीबिस्किट यांसह अन्य विविध पॅकबंद पदार्थांच्या वेष्टनांवर प्रोटीनकॅलरी वैगेरे अशा अनेक चांगल्या गोष्टी असल्याचा दावा विदेशी आणि देशी आस्थापनांकडून केला जातोपण हे खरे नसते.
          विविध आकर्षित पद्धतीने 'जंक फूड'ची जाहिरात करून जनतेची दिशाभूल होत आहे. सरकारने यावर तात्काळ बंदी आणली पाहिजे. जंक फूड देशी असो वा विदेशी त्याचा भारतीयांनी त्याग करायला हवा. आयुर्वेदात सांगितल्यानुसार ज्या अन्नावर हवासूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश स्पर्श किंवा संपर्क आला आहे असेच अन्न खायला हवे असे आवाहन सुविनय दामले यांनी केले.     प्रत्येक खाद्यपदार्थाची गुणवत्ता पाहून त्याचा अहवाल जनतेसमोर उघड केल्यावरच त्याच्या विक्रीला अनुमती मिळायला हवी, मात्र आता असे होताना आता दिसत नाही. अनेक आस्थपनांकडे ते पुरवणारे पॅकबंद अन्न आणि पाणी यांविषयी नीट परवाने नसतांना त्यांना आपल्या देशात व्यवसाय करू दिला जात आहे. 
एफ्.एस्.एस्.ए.आय.  आणि एफ्.डी.ओ. यांसारख्या संस्था जोपर्यंत निष्पक्ष आणि भ्रष्टाचारमुक्त काम करणार नाहीत. तोपर्यंत भारतीयांना पौष्टीक अन्न मिळणे अशक्य असल्याचे उत्तरप्रदेश येथील भूतपूर्व सैनिक कल्याण संघटनेचे संघटन मंत्री इन्द्रसेन सिंह यांनी सांगितले.या वेळी खाद्य आणि पोषण विशेषज्ञ मीनाक्षी शरण म्हणाल्या कीजंक म्हणजे कचरा. ज्या अन्नात कोणतेही पोषकतत्त्व नसतातत्याला जंक फूड म्हटले जाते. जंक फूड  खाणे म्हणजे स्वत:च्या पोटात कचरा भरण्यासारखे आहे. याने शरीराचे पोषण न होता उलट कुपोषण होते. यामध्ये सर्व बेकरी, हवाबंद पदार्थ आणि पेय येतात. केवळ लहान मुलेच नव्हे, तर पालकदेखील जंक फूडला बळी पडले आहेत. भारतीय आहारशास्त्राचा जीवनात अवलंब करायला हवा. 

'जंक फूड'च्या आहारी न जाता स्वदेशी आणि ताजे अन्न ग्रहण करा अन् स्वस्थ रहा- वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय 'जंक फूड'च्या आहारी न जाता स्वदेशी आणि ताजे अन्न ग्रहण करा अन् स्वस्थ रहा-      वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads