Header AD

भिवंडीत पोलीस पकडण्यासाठी आले असता चौथ्या मजला वरून पडून आरोपीचा मृत्यू ,कुटुंबीयांचा पोलिसांनी ढकलून दिल्याचा आरोप परिसरात तणाव ,पोलिसांना धक्का बुक्की

 
भिवंडी दि 2 (प्रतिनिधी ) शहरातील कसाई वाडा या ठिकाणी आरोपीस पकडण्यासाठी आलेल्या वापी गुजरात येथुन आलेल्या पोलिसांना सोबत झटापटीत चौथ्या मजल्या वरून पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना भिवंडीत घडली आहे जमिल कुरेशी उर्फ जमील टकला वय 38 असे मयत आरोपीचे नाव असून , या घटने नंतर परिसरात मोठा जमाव जमून तणाव निर्माण होऊन पकडण्यासाठी आलेल्या पोलिसां सोबत नागरिकांनी झटपट करीत धक्काबुक्की झाली त्यानंतर अधिक पोलीस कुमक मागवून जमावास शांत करून पांगविण्यात आले आहे .
            भिवंडी कसाई वाडा येथे राहणार जमील कुरेशी हा गोवंश चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्या विरोधात वापी गुजरात येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्या साठी गुजरात पोलिसांचे पथक भिवंडी येथे आले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक सोबत कसाई वाडा येथे आरोपीस पकडण्यास गेले असता आरोपी आपल्या चौथ्या मजल्या वरील घरात लपून बसला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटपट होऊन खिडकीतून त्याचा तोल जाऊन तो चौथ्या मजल्या वरून थेट जमिनीवर आदळला ज्यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला .
         या घटने नंतर परिसरातील मोठा जमाव घटनास्थळी जमा होऊन त्यांनी गुजरात व गुन्हे शाखेच्या पोलिसांना अडवून त्यांनी जमील कुरेशी यास खिडकीतून ढकलून दिले असा आरोप करीत गदारोळ घालीत पोलिसां सोबत धक्काबुक्की झाली . तर आज शुक्रवार च्या नमाज नंतर जमील कुरेशी हा घरात जेवत असताना गुजरात पोलीस थेट त्याच्या घरात घुसून त्यास ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची आरोप मयत जमील कुरेशी ची वहिनी अनिसा कुरेशी यांनी केला आहे .   
          या घडामोडी नंतर स्थानिक निजमपुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अधिक पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी जमा झालेले जमाव शांत करीत पंगविला व त्यानंतर मृतदेह शवविच्छेदना साठी आयजीएम रुग्णालयात दाखल केला . या नंतर दोन्ही ठिकाणी मोठी पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती.
       पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण व सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल होत तेथे ही जमा झालेले जमाव पांगविण्यात आला असून ,गुजरात पोलिसांनी परस्पर गुन्हे शाखेच्या पोलिसां सोबत सदरची कारवाई स्थानिक निजमपुरा पोलिसांना न कळविताच करण्याचे धाडस केले व त्यानंतर पोलीस कारवाई बाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत .
        दरम्यान या बाबत योग्य ती माहिती घेऊन जे दोषी असतील त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी देत सध्या परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात आल्याचे सांगितले .

भिवंडीत पोलीस पकडण्यासाठी आले असता चौथ्या मजला वरून पडून आरोपीचा मृत्यू ,कुटुंबीयांचा पोलिसांनी ढकलून दिल्याचा आरोप परिसरात तणाव ,पोलिसांना धक्का बुक्की भिवंडीत पोलीस पकडण्यासाठी आले असता चौथ्या मजला वरून पडून आरोपीचा मृत्यू ,कुटुंबीयांचा पोलिसांनी ढकलून दिल्याचा आरोप परिसरात तणाव ,पोलिसांना धक्का बुक्की Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads