Header AD

दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई


दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना उप आयुक्त अशोक बुरपल्ले , सहाय्यक आयुक्त महेश आहेर सोबत इतर कर्मचारी....



ठाणे ,  प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.



            या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील एनआरनगर तळ अधिक ३ मजली इमारतीतील ४ थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.

दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on July 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads