Header AD

माजी आमदार नरेंद्र पवार यांचा स्थलांतरित , नुकसान ग्रस्तांना मदतीचा हात शहाड वडवली - अटाळी भागात केली पाहणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शहाडवडवली-अटाळीतील पाणी साचलेल्या भागाची  माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.कालपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.  शहाडवडवली-अटाळी  परिसरात अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील वस्तू पाण्यात वाहून गेले अनेकांना जीव वाचविण्यासाठी घर सोडून स्थलांतरित व्हावे लागले. अशा  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र ६ अटाळी-वडवली भाग व प्रभाग क्रमांक १५ शहाडमधील सखल भागातील पाण्यात उतरून नरेंद्र पवार यांनी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.कालपासून समाजमाध्यमात धरणाचे पाणी सोडल्याच्या अफवा पसरल्या जात होत्या त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. नरेंद्र पवार यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती घेतली व धरण अद्याप भरले नसल्याची माहिती देऊन नागरिकांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे मोहने-टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईरभाजपाचे मोहन कोनकरनवनाथ पाटील व  स्थानिक पदाधिकारी सोबत होते.   तसेच पाणी भरलेल्या ठिकाणी आयोजित केलेल्या मदत केंद्रांना भेटी दिल्या त्यामध्ये टिटवाळा मोहने मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईरनगरसेविका उपेक्षा भोईर यांनी मोफत जेवणाची व्यवस्था केली. वडवली-अटाळी भागात भाजपाचे नवनाथ पाटील संदीप पाटील यांनी फूड पॉकेटपिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. पावसाचा मोठा फटका बसलेल्या बंदरपाड्यातील स्थलांतरितांना भाजपाचे मोहन कोनकर यांनी जेवणाची व्यवस्था केली होती.हवामानखात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने पुढील २४ तास जनतेने खबरदारी घ्यावी व काहीही मदत लागली तर तातडीने संपर्क करण्याचे आवाहन नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील जनतेला केली आहे.

माजी आमदार नरेंद्र पवार यांचा स्थलांतरित , नुकसान ग्रस्तांना मदतीचा हात शहाड वडवली - अटाळी भागात केली पाहणी माजी आमदार नरेंद्र पवार यांचा स्थलांतरित , नुकसान ग्रस्तांना मदतीचा हात शहाड वडवली - अटाळी भागात केली पाहणी Reviewed by News1 Marathi on July 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads