Header AD

ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालया जवळील एसटी वर्क शॉपच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि ठाणे स्थानका जवळील एसटी स्टॅंडच्या जागेत अंडर ग्राऊंड पार्कींग प्लाझा उभारण्याचा मार्ग मोकळा


कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपची जागा आणि ठाणे स्टेशनवरील एसटी स्टँडची जागा देण्यास परिवहन मंत्र्यांची तत्वतः मंजुरी / नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश...मुंबई :- ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी म्हणजेच कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपच्या जागेवर पालिकेचे  सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्याला, तसेच ठाणे स्टेशन जवळील एसटी स्टँडची जागा भूमिगत पार्कींगसाठी द्यायला परिवहन विभागाने तत्वतः मंजुरी दिलेली आहे.           कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयाला लागून असलेल्या एसटी वर्कशॉपच्या जागेचा पुनर्विकास करून त्याजागी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत. त्यासोबतच ठाणे स्टेशन जवळील एसटी स्टँडच्या जागेवर भूमिगत पार्कींग उभारण्यासाठी देखील ते प्रयत्नशील आहेत.          या अनुषंगाने आज श्री. शिंदे यांच्या अध्यक्षते खाली मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दोन्ही प्रकल्पांचा सुधारित विकास आराखडा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासमोर सादर करण्यात आला.           यावेळी या दोन्ही योजनांना जागा देण्यासाठी तत्वतः मंजुरी देताना एसटीची गरज आणि पुरेशी जागा उपलब्ध करून विकसित करायला हरकत नसल्याचं मत त्यांनी त्यांनी मांडले. त्यानुसार ठाणे महानगरपालिका आणि परिवहन विभाग यांचे अधिकारी एकत्र बसून सर्वंकष सुधारित आराखडा सादर करण्यावर या बैठकीत एकमत झाले आहे.              ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवणे आणि स्टेशनकडे येणाऱ्या वाहनांना पुरेसे पार्कींग उपलब्ध करून देणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने त्यासाठी हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे बनले होते. आज परिवहन मंत्र्यांनी या दोन्ही मागण्या तत्वतः मान्य केल्याने हे प्रकल्प वेगाने पुढे नेणे शक्य होईल असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.           आज झालेल्या या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि परिवहन विभागाचे भूषण देसाई हे उपस्थित होते.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालया जवळील एसटी वर्क शॉपच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि ठाणे स्थानका जवळील एसटी स्टॅंडच्या जागेत अंडर ग्राऊंड पार्कींग प्लाझा उभारण्याचा मार्ग मोकळा ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालया जवळील एसटी वर्क शॉपच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि ठाणे स्थानका जवळील एसटी स्टॅंडच्या जागेत अंडर ग्राऊंड पार्कींग प्लाझा उभारण्याचा मार्ग मोकळा Reviewed by News1 Marathi on July 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads