Header AD

डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर या संकल्पनांची देशात वाहवा

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा


कल्याण ,कुणाल  म्हात्रे  : डॉक्टर्स आर्मीफॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर या संकल्पनांची सर्व देशभरात वाहवा झालीअसे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांनी आज काढले. आजच्या डॉक्टर्स डे  चे औचित्य साधून वसंत व्हॅली येथील महापालिकेच्या प्रसुतीगृहात

आयोजिलेल्या डॉक्टरांच्या गौरवपर कार्यक्रमात ते बोलत होते. मी रुजू झाल्यावर कोविड सुरु झालापरंतू डॉक्टर्स संघटनांनी ऊत्साह वाढविलाआशा दिल्या त्यामुळे डॉक्टर्स आर्मी ही संकल्पना कल्याण डोंबिवली रुजलीरुळली.  डॉक्टर्स आर्मीफॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर  ही संकल्पना आता सर्व देशभर वाखाणली गेली आहेअत्यंत अल्प कालावधीत जॅंम्‍बो फॅसिलीटी उभारणारी महाराष्ट्रातील ही एकमेव महापालिका आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिली. व्हॅलेंटाईन दिनाला रुजू झालो कारण काम हेच माझे व्हॅलेंटाईन आहेअशी‍ मिश्किल पुस्ती देखील त्यांनी यावेळी जोडली.  कोविडच्या दुस-या लाटेनंतर आता महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात मॉडयुलर ओटी सुरु होणार असून सर्व शस्त्रक्रिया तिथे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वसंतव्हॅलीशक्तिधामविठ्ठलवाडी आणि रुक्मिणी प्लाझा या  ४  ठिकाणी आता कायम स्वरुपी रुग्णालये सुरु केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेची १६  नागरी आरोग्य केंद्रे असून आता नागरिकांच्या सेवेसाठी सध्या एकुण २५  आणि भविष्यात ३६  नागरी आरोग्य केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. महापालिकेमार्फत डायलेसिस सेंटरही सुरु केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी यावेळी दिली.     या कार्यक्रमात महापालिकेचे डॉक्टर्सआयएमएकॅम्पा,   निमा,   होमि ओपॅथिक इ. वैदयकीय संघटनांच्या पदाधिका-यांचा व कोविड काळात इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत करणाऱ्या इंजिनिअर्सचा प्रातिनिधिक स्वरूपात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांच्याहस्ते तुळशीचे रोप व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून ऑपरेशन थिएटरओपिडी इ. सुविधांयुक्त प्रसुतिगृह वसंत व्हॅली येथे आज सुरु करण्यात आले आणि एक बाळंतपणही सुखरुपरित्या पार पडले.

डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर या संकल्पनांची देशात वाहवा डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर या संकल्पनांची देशात वाहवा Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads