Header AD

यप्पटीव्हीने झी चॅनेल्स रिलाँच केले

 मुंबई / भारत, १ जुलै २०२१ : यप्पटीव्ही, या साउथ एशियन कंटेंटसाठी जगात सर्वात आघाडीचा प्लॅटफॉर्मने अमेरिका आणि कॅनडा येथे झी नेटवर्क चॅनल्स लाँच केले आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना झी चॅनेल्सचे रिलेटेबल फिक्शन, हाय व्होल्टेज नॉन-फिक्शन, भव्य कार्यक्रम आणि हिंदी आणि प्रादेशिक भाषांतील ब्लॉकबस्टर चित्रपट असा विस्तृत संमिश्र कंटेंट मिळेल. झी चॅनेल्सच्या लाँचिंगद्वारे, यप्प टीव्हीने भारतीय मनोरंजन क्षेत्रात बहुतांश सर्व भाषा आणि शैलींना स्पर्श केला आहे.यप्पटीव्हीचे संस्थापक आणि सीईओ श्री उदय रेड्‌डी म्हणाले, “झी एंटरटेनमेंट या आघाडीच्या मनोरंजन नेटवर्कसोबत पुन्हा एकदा भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. जेणेकरून अमेरिका आणि कॅनडातील बाजारात मनोरंजनाचे चॅनेल्स पुन्हा पोहोचवता येतील. झी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषत: अमेरिका, जिथे भारतीय संस्कृतीशी तो समांतर आहे, अशा ठिकाणी तो नि:संशयपणे सर्वात पॉवरफुल भारतीय ब्रँड आहे. अमेरिकन मार्केट हे डिजिटायझेशनबाबत सर्वात आघाडीवर असते. केवळ वापराबाबतच नव्हे तर अॅड सेल्समध्येही ते पुढे आहे. आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, झी जाहिरातदारांना इन्क्रिमेंटल एचएचएस तसेच डिलिव्हरी(इम्प्रेशन्स) वर आधारीत धोरणात्मक डील्सची सुविधा प्रदान करू शकतो. राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर ही सुविधा उपलब्ध असून इतर कोणतेही प्लॅटफॉर्म अशा प्रकारचा लाभ प्रोग्रामर्सना प्रदान करत नाहीत. यप्प वरील प्रत्येक जाहिरात अखेरच्या डॉटपर्यंत मोजता येऊ शकते. अमेरिकेतील साउथ एशियन अॅडव्हरटाइजर्ससाठी हे गेमचेंजर ठरेल.”यप्पटीव्हीचे यूझर्स या प्लॅटफॉर्मवरून झी चॅनल्सच्या सुविधा मिळवू शकतात. मग यात ‘कुमकुम भाग्य’ सारखे मोहक कौटुंबिक नाट्य, ‘भाभी जी घर पर है’ सारखे कौटुंबिक विनोदी किंवा ‘ इंडियन प्रो म्युझिक लीग’ सारखे रिअॅलिटी शो या सर्वांचा समावेश होतो. यूझर्सना झीटीव्ही, अँड टीव्ही आणि झी सिनेमा (लेटेस्ट मूव्हीज) यासारखे चॅनेल्स पाहता येतील. तसेच झी तेलगू, झी तमिळ, झी कन्नडा, झी केरलम, झी पंजाबी, झी मराठी आणि झी बांगला यासारखे विविध प्रादेशिक चॅनलही पाहता येतील. अमेरिका आणि कॅनडा मार्केटमध्ये या नेटवर्कच्या रिलाँचसह, यप्पटीव्हीचे यूझर्स विविध भाषा आणि शैलीतील कार्यक्रमांचा मनमुरादपणे आस्वाद घेऊ शकतील.

यप्पटीव्हीने झी चॅनेल्स रिलाँच केले यप्पटीव्हीने झी चॅनेल्स रिलाँच केले Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads