Header AD

कोविडची तिसरी लाट जरी आली तरी सर्वांनी मिळून सामना करुया वैदयकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील
कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कोविडची तिसरी लाट जरी आली तरी सर्वांनी मिळून सामना करु याअसे उद्गार वैदयकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी नुकतेच काढले. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार महापालिकेच्या वैदयकीय अधिका-यांसाठी कोविड टास्क फोर्स कमिटीच्या डॉक्टरांनी आयोजिलेल्या मार्गदर्शनपर चर्चासत्रात त्यांनी हे उद्गार काढले.या चर्चासत्रात रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीशास्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीमहापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात काम करणारे वैदयकीय अधिकारी त्याचप्रमाणे महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी तसेच मुख्यालयातील वैद्यकीय अधिकारी यांना कोविड टास्क फोर्समधिल डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. 
कोविडची तिसरी लाट जर आली तर काय काळजी घ्यावीकोविडची सौम्य लक्षणे दिसल्यास काय उपाययोजना कराव्यात याबाबत कोविड टास्क फोर्स कमिटीचे डॉ.अमित सिंग यांनीमध्यम लक्षणे दिसल्यास त्याबाबत कशाप्रकारे उपाययोजना कराव्यात या संदर्भात कोविड टास्क फोर्स कमिटीचे डॉ. हिमांशू ठक्कर आणि तीव्र लक्षणे दिसल्यास कोविड रुग्णाची कशी काळजी घ्यावी याबाबत डॉ. श्रेयस गोडबोले यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले.       सध्या कोविड आजार झालेले अनेक रुग्ण हे सहव्याधी असलेले  रुग्ण असतात. सदर रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करावेत याबाबत टास्क फोर्स कमिटीचे डॉ. राजेंद्र केसरवानीडॉ. अमित बोटकोंडले यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले. या चर्चासत्राचा कोविड रुग्णांवर उपचार करतांना निश्चितच फायदा होईलअशी भावना महापालिकेच्या वैदयकीय अधिका-यांनी यावेळी व्यक्त केली.

कोविडची तिसरी लाट जरी आली तरी सर्वांनी मिळून सामना करुया वैदयकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील कोविडची तिसरी लाट जरी आली तरी सर्वांनी मिळून सामना करुया वैदयकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील Reviewed by News1 Marathi on July 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads