Header AD

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कचरा प्रश्न सोडवा... मनसैनिकांची पालिका आयुक्तांना मागणी...

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवलीतील कचरा प्रश्न गाजत असताना `डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कचरा प्रश्न सोडवा`अशी मागणी एका मनसैनिकाने पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.डोंबिवली एमआयडीसी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असताना दुर्गंधी पसरली असून साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.     याकडे मनसैनिक शशिकांत कोकाटे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून एमआयडीसी परिसरात कचऱ्याचे ढिग पसरल्याचा एका व्हिडीओच्या माध्यमातून दाखवले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून निदान आता तरी घनकचरा व्यवस्थापन विभागाला जाग येईल अशी आशा व्यक्त केली आहे.        घनकचरा उपविधी कराचा प्रश्न  प्रश्न कल्याण-डोंबिवली शहरात चर्चेचा विषय बनला आहे.तर दुसरीकडे रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या परिस्थितीला नागरिक आणि फेरीवाले जास्त प्रमाणात जबाबदार असल्याचे मनसैनिक शशिकांत कोकाटे यांनी सांगितले आहे.           पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कर्मचारी आपले काम व्यवस्थित करत असले तरी कचरा वाहणारे डंपर आणि आवश्यक साधनसामुग्री नसल्याने कर्मचारी तरी किती कचरा उचलणार असा प्रश्न कोकाटे यांनी उपस्थित केला आहे.
      पालिका आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी या परिस्थितीकडे लक्ष देऊन डोंबिवली एमआयडीसी परिसरात कचरा उचलण्यासाठी आवश्यक साधन-सामुग्री उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील गोल मैदान येथे कचऱ्याचे ढीग झाले आहे.या ठिकाणी कोकाटे यांनी व्हिडीओ काढून येथील परिस्थितीची माहिती दिली.

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कचरा प्रश्न सोडवा... मनसैनिकांची पालिका आयुक्तांना मागणी... डोंबिवली एमआयडीसी परिसरातील कचरा प्रश्न सोडवा...        मनसैनिकांची पालिका आयुक्तांना मागणी... Reviewed by News1 Marathi on July 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads