Header AD

लेवरेज एडुची देशातील ११० शहरांत परदेशी शिक्षण सल्लागार सुविधा


५००‘लेवरेज पार्टनर्स’चा आकडा केला पार ~मुंबई, १ जुलै २०२१: लेवरेज एडू या भारतातील सर्वात मोठ्या युनिव्हर्सिटी अॅडमिशन प्लॅटफॉर्मने, भारताच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेतील प्रमुख बाजारातील विदेशी शिक्षणासंबंधी सल्लागारांच्या जोडणीचा ५०० चा आकडा पार केल्याची घोषणा केली. ‘लेवरेज पार्टनर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेटवर्कचा विस्तार भारतातील ११० शहरे आणि गावांमध्ये आहे.यात चंदिगड, कोचिन, वडोदरा आणि जालंधर यासारख्या प्रमुख नॉन-मेट्रो मार्केटचाही समावेश आहे. या शॉपिफाय-सारख्या लेवरेज पार्टनर प्रोग्रामद्वारे लहान आणि मध्यम स्टडी अब्रॉड कन्सल्टंटना ‘लेवरेज एडु’च्या २००+ मजबूत युनिव्हर्सिटी पार्टनर नेटवर्कच्या मदतीने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेचा दरही वाढवण्यास मदत केली जाईल. त्यांच्यासाठी हे मास्टर एजंट म्हणून काम करतील.कंपनीच्या मालकीचे ‘पार्टनर डॅशबोर्ड’ आणि ‘एआय कोर्स फाइंडर’ च्या माध्यमातून भागीदारांना जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाने सक्षम केले जाईल. त्यांना स्टुडंट-फर्स्ट-डेटा आधारीत सल्ला दिला जाईल. दैनंदिन स्टुडंट अॅप्लिकेशनचे व्यवस्थापनही तयार करून दिले जाईल. यात मार्कशीट पडताळणी, कॉपीसंबंधी तपासणी, युनिकनेक्ट इव्हेंट्स इटी एएलद्वारे विद्यापीठांशी थेट संपर्क साधता येईल. भागीदारांना विद्यार्थ्यांसाठी लेवरेज लाइव्हद्वारे आयईएलटीएस क्लासेसचीही सुविधा पुरवता येईल. तसेच इतर शैक्षणिक कर्ज, परकीय चलन आणि निवासाची व्यवस्था इत्यादी मूल्यवर्धित सेवाही विद्यार्थ्यांना देता येतील.लेवरेज एडुचे संस्थापक आणि सीईओ, अक्षय चतुर्वेदी म्हणाले, “आमच्या लेवरेज पार्टनर प्रोग्रामच्या यशाने मी खूप भारावून गेलो आहे. आम्ही वेगाने आमचे नेटवर्क वाढवत असून सध्या अजून सर्वांसोबत आणखी सखोल काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्या व्यवसाय आणि प्रभावी स्वप्नांमध्ये यशस्वी होऊत. आम्हाला भारतातील प्रत्येक लघु/मध्यम पातळीवरील स्टडी अब्रॉड कंसल्टंटला आजपासून ५ वर्षांनी पुढील तंत्रज्ञानाने सुसज्ज करायचे आहे. याद्वारे त्यांनी अॅप्लिकेशन मॅनेजमेंट प्रक्रिया सोपी होईल आणि पूर्णपणे जीवन बदलण्याच्या त्यांच्या उद्दिष्टात मदत होईल.”लेवरेज एडू सध्या विद्यार्थ्यांना दोन प्रकारे सेवा देतो: त्याच्या पूर्णपणे ऑनलाइन चॅनलद्वारे (येथे मागील महिन्यात ६३० गावे आणि शहरांतूनही विद्यार्थी जोडले गेले.) आणि दुसरे म्हणजे लेवरेज पार्टनर नेटवर्क ऊर्फ शॉफिफाय-सारख्या ओम्नीचॅनलद्वारे (सध्या ११० गावे आणि ५०० पेक्षा जास्त भागीदारांचा समावेश आहे). या प्लॅटफॉर्मवर वर्षाला १५ दशलक्षांपेक्षा जास्त व्हिजिटर्स भेट देतात आणि कंपनी प्रत्येक महिन्यात ५०,०००+ जास्त सल्लागार सेवा पुरविते.

लेवरेज एडुची देशातील ११० शहरांत परदेशी शिक्षण सल्लागार सुविधा लेवरेज एडुची देशातील ११० शहरांत परदेशी शिक्षण सल्लागार सुविधा Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads