Header AD

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बैलगाडी आंदोलन

 

महिलांनी शिजवले चुलीवर अन्न  तरुणांनी चालविल्या सायकली...


ठाणे (प्रतिनिधी)  -  गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर समन्वयक मा. खा. आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, प्रदेश  सचिव सुहास देसाई यांच्या उपस्थितीमध्ये  पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात आक्रमक भूमिका घेत, चूल पेटवून; बैलगाडी- सायकल चालवून  मोदी सरकारचा निषेध केला.           गेल्या काही दिवसां पासून इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. या  दरवाढीमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणार्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहनधारक त्रस्त बनले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही प्रचंड वाढलेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. 
         यावेळी कार्यकर्त्यांनी, मोदी फेकतो डोळ्यात धूळ रिकामे सिलिंडर पेटते चूल;   तेल का खेल, मोदी सरकार फेल;  भाजप की नियत झुटी है, महंगाई फिर से लौटी है;सिलिंडर हुआ 800 पार, कहाँ हो मोदी सरकार; हर रोज किंमत बढाओगे, अच्छे दिन कब लाओगे;  वाह रे मोदी तेरा खेल, महंगा डिझेल, महँगा तेल; मोदी सरकार मुर्दाबाद  अशा घोषणा दिल्या.         तर, महिलांनी या ठिकाणी चूल पेटवून भाकर्या भाजल्या. काही कार्यकर्त्यांनी मोदींचे मुखवटे घालून  रिकामा सिलिंडर उचलून तर शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी बैलगाडी हाकून केंद्र सरकारचा निषेध केला.           यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले की, गेल्या महिनाभरात 790 रुपये असणारा सिलिंडर 834. 50 रुपये  एवढा महाग झाला आहे. याचा महिलांनी निषेध चूल पेटवून केला आहे. ठाण्यात सध्या पेट्रोलचा दर 105 रुपये झाला आहे. त्यामुळे  युवक आणि युवतींनी सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला आहे तर, बैलगाडी चालवून आता कार पेक्षा बैलगाड्याच चालवाव्या लागतील, असा संदेश देत केंद्र सरकारचा निषेध केला आहे.         राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा मार्गदर्श नाखाली कृतीतून मोदी सरकारचा निषेध केला आहे. मोदी सरकार हे सामान्यांना लुटण्यासाठी आहे. एकीकडे कोरोनाची महामारी असताना;   बेरोजगारी वाढलेली असताना, इंधनाचे दर प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळेच आम्ही मोदी सरकारचा निषेध करीत आहोत. जनतेच्या मनातील रोष ओळखून आता तरी मोदी सरकारने इंधनाच्या दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करीत जर इंधनाचे दर कमी केले नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही परांजपे यांनी दिला.             या आंदोलनात सभापती महिला व बालकल्याण तथा नगरसेविका राधाबाई जाधवर ,  उथळसर प्रभाग समिती  सभापती तथा नगरसेविका वहिदा खान ,   कळवा प्रभाग समिती सभापती तथा नगरसेविका वर्षा मोरे, , मा. विरोधी पक्षनेत्या तथा नगरसेविका प्रमिलाताई केणी  नगरसेविका आरती गायकवाड ,  अंकिता शिंदे, सुलोचना हीरा पाटील , नगरसेवक महेश साळवी,  परिवहन समिती सदस्य शमीम खान, प्रकाश पाटील, नितीन पाटील, महिला अध्यक्षा सुजाता ताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, माजी युवक अध्यक्ष  मंदार केणी, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावले,          लीगल सेलचे अध्यक्ष विनोद ऊतेकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष दिलीप नाईक, असंघटित कामगार सेलचे राजू चापले, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, पदवीधर सेलचे अमित उबे शहर कार्यकारिणी सदस्य हीरा पाटील, सिल्वेस्टर डिसोजा, रचना वैद्य, प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, संदीप जाधव, सचिन खुस्पे, अजित सावंत,   सचिन सुर्वे,  लखबीर सिंह गिल, संतोष सहस्त्रबुद्धे,  मिलिंद  डीचोलकर, विजय पवार, मयुर सारंग, बिरू कांबळे, महेश माने, शिवा कालुसिंग, प्रदीप साटम, प्रवीण भानुशाली, विधानसभा अध्यक्ष व कार्याध्यक्ष विजय भामरे, महेंद्र पवार, विक्रम घाग,             ब्लॉक अध्यक्ष व कार्याध्यक्ष समीर पेंढारे, निलेश कदम, निलेश फडतरे, रत्नेश दुबे, अजय सपकाळ, विशाल खामकर, विलास पाटील, तुळशीराम म्हात्रे, बबलू शेमना, जावेद शेख, संताजी गोळे,  राहुल ठाणेकर, तुकाराम गायकवाड  किशोर चव्हाण, कैलास सूरकर, अभिजीत दळवी, बलवान सिंग सोनी, सूरज यादव, सुमीत गुप्ता, रवींद्र साळुंखे, संदीप ढकोलिया, विवेक गोडबोले, साई प्रभू, रोहित गवळी, तुळशीराम साळवे, नजीर शेख, विजय काकडे, संदेश पाटील, अभिषेक पुुसाळकर, मुज्जू मुल्ला, समीर नेटके, अरफाश खानबंदे, विशांत गायकवार, देवा पवार, राजेश साटम,                संजय साळुंखे, केशव कांबे, प्रमोद कांबळे, राजेश कदम, दिनेश बने, कुणाल पाटील, जयेश पाटील, प्रशांत गायकवाड, दिलीप उपाडे, प्रसाद केलगंद्रे, माणिक शिंदे,  श्रीकांत भोईर,  श्रीकांत तळेकरे, संदीप येताळ, विजय यादव, सुनिष निशाद, महेश लगड, सचिन गलांडे, निलेश जाधव, जितेश पाटील, आकाश पगारे, सिद्धीकी शेख, प्रविण रेड्डी, संकेत पाटील, सनी वाघमारे, यासिन शेख, लखन जाधव, रोहन भोईर, विक्की कांबळे,   महिला विधानसभा अध्यक्ष फुलबानो पटेल, शशिकला पुजारी, कांता गजमल, साबिया मेमन तसेच सर्व महिला पदाधिकारी, युवती पदाधिकारी, कळवा-मुंब्रा विधानसभा युवती अध्यक्षा पुजा शिंदे , नेहा नाईक , पुजा दामले, आदी सहभागी झाले होते.

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बैलगाडी आंदोलन इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बैलगाडी आंदोलन Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads