Header AD

फी वसुली विरोधात डॉन बास्को शाळे समोरील पालकांच्या ठिय्या आंदोलनात भाजप पाठिंबा

  डोंबिवली   शंकर जाधव ) फी वसुली विरोधात  डोंबिवली तील डॉन बॉस्को शाळेच्या समोर पालकांनी  सोमवारी ठिय्या आंदोलन केले.शाळेची फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांची आँन लाईन शाळा बंद करण्याचा निर्णय शाळेने घेतल्याने संतप्त पालकांनी शाळेसमोर बसून ठिय्या आंदोलन केले.
         मागील वर्षीपेक्षा अडीच हजाराने फीमध्ये वाढ करण्यात आली असून पूर्ण फी न भरल्यास विद्यार्थ्याला ऑनलाइन शाळेमध्ये प्रवेश नाकारला जाईल असे शाळेकडून सांगण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीने  पालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मंगळवारी शाळेच्या संचालक बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. 
    या आंदोलनात भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब,माजी सरपंच कर्ण जाधव,डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्षा सुहासिनी राणे,रसिका पाटील,राजू शेख आदींसह अनेक कार्यकर्ते आणि पालकवर्ग सहभागी झाले होते.यावेळी  भाजप डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष परब म्हणाले कि , करोनामुळे अनेक पालकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत.
          तर काही हातावर पोट असणारे पालक आहेत. या सगळ्याचा विचार करून शाळेने निर्णय घ्यावा. फी भरण्यासाठी पालक  तयार आहोत परंतु त्यासाठी पुरेसा वेळ आम्हाला देण्यात यावा. फी न भरल्याने ऑनलाइन शाळेत प्रवेश नाकारल्याने अनेक विद्यार्थी घाबरून उदास झाले आहेत. या सगळ्या गोष्टींचा फी वाढ करताना शाळेने बारकाईने विचार करावा.  डॉन बॉस्को शाळा मनमानी पद्धतीने शैक्षणिक फी वाढवत आहे. 
       फी वाढीचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळेने अरेरावी केली. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेसमोर गर्दी केली.मागील वर्षी शाळेची फी १६ हजार होती ती यंदा अडीच हजाराने वाढवत साडे अठरा हजार करण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्धी फी भरलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळा सुरू असून या महिनाअखेरपर्यंत पूर्ण फी न भरल्यास पाल्याला ऑनलाइन शाळेत बसता येणार नसल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. 
          मागील वर्षीचे प्रगती पुस्तकही यावर्षीची पूर्ण फी भरल्याशिवाय मिळणार नसल्याची भूमिका शाळेने घेतल्याचा आरोप पालकांनी यावेळी केला. तर मंगळवारी सकाळी शाळा संचालकांशी बोलून यावर तोडगा काढण्यात येईलअसे शाळेकडून सांगण्यात आले.

फी वसुली विरोधात डॉन बास्को शाळे समोरील पालकांच्या ठिय्या आंदोलनात भाजप पाठिंबा फी वसुली विरोधात डॉन बास्को शाळे समोरील पालकांच्या ठिय्या आंदोलनात भाजप पाठिंबा Reviewed by News1 Marathi on July 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads