Header AD

मलंगगड भागात रुग्णालया अभावी निष्पाप बाळाचा गेला जीव

 

■राजकारणाच्या वादात सरकारी रुग्णालय बंदच प्रशासनचे आरोग्य व्यवस्थे कडे सपशेल दुर्लक्ष...कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात रात्रीच्या सुमारास एका महिलेची चक्क टेम्पो मध्ये प्रसृती झाली. परंतु बाळाचा जन्माला येतात मृत्यू झाला. ग्रामीण भागातील राजकीय वादातून बंद असलेल्या सरकारी रुग्णालयामुळे एका बालकाचा बळी गेला आहे.कल्याण शहरा पासून काही किमीच्या अंतरावर असलेला मलंगगड हा ग्रामीण भाग आहे. या भागात मांगरूळ येथे एक सरकारी रुग्णालय आहे. मात्र स्थानिक राजकीय स्वार्थ आणि वादावादीमुळे हे रुग्णालय सदा न कदा बंदच असते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मलंगगड भागातील म्हात्रेपाडा कातकरी वाडीतील वंदना लक्ष्मण वाघे या महिलेला प्रसृतीकळा सुरू झाल्या. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने टेम्पो मधून तिला मांगरूळ येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हे रुग्णालय बंद अवस्थेत होते. त्यानंतर या महिलेला उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच या महिलेची प्रसृती झाली. आणि या महिलेच्या पोटी जन्म घेताच वेळेत उपचार न झाल्याने ते बाळ दगावले.वर्षभरात अश्या ३ घटना  घडल्या असल्याचे येथील लोक सांगत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी महिलेला ९ महिन्यातून फक्त एकच इंजेक्शन दिले असल्याचा संतापजनक आरोप देखील नागरिकांनी केला आहे. ग्रामीण भागातील ही आरोग्य केंद्र आणखी किती लोकांचा जीव घेणार आहे असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड ग्रामीण भागात सतत राजकीय पुढाऱ्यांची रेलचेल सुरू असते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच नेवाळी येथे फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण केले होते. मात्र असे जरी असले तर प्रत्यक्षात मात्र या भागात आरोग्याचा प्रश्न काय आहे हे या घटनेतून पुढे आले आहे. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी आरोग्य सोयी सुविधांसाठी विशेष लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.या भागात आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर एकही रुग्णालय उपलब्ध नाही. विशेष म्हणजे मांगरूळ येथील रुग्णालय हे डागडुजीचे कारण देऊन लोकांच्या आरोग्य आणि जीवाशी हेळसांड करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडवणार तरी कोण ? गरिबांचा वाली आहे तरी कोण की नुसताच राजकीय स्वार्थातून असे बळी जात राहणार असा सवाल येथील गावकरी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विचारत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वतःच अश्या गोष्टींची गंभीरपणे दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मलंगगड भागात रुग्णालया अभावी निष्पाप बाळाचा गेला जीव मलंगगड भागात रुग्णालया अभावी निष्पाप बाळाचा गेला जीव Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads