Header AD

वी फाऊंडर सर्कलची नेस्टरुट्स मध्ये गुंतवणूक

 मुंबई, २ जुलै २०२१ : स्टार्टअप गुंतवणूक व्यासपीठ ‘वी फाऊंडर सर्कल’ (डब्ल्यूएफसी)ने प्रारंभिक-टप्प्यातील स्टार्टअप्सना वित्तपुरवठा करण्याच्या मोहिमेच्या अनुषंगाने होम डेकोर स्टार्टअप नेस्टरुट्समधील १००, ००० अमेरिकन डॉलर्स (कर्ज आणि इक्विटी एकत्रित) किंमतीच्या सीड फंडिंग राऊंडमध्ये भाग घेतला. गुडगाव स्थित स्टार्टअप असलेल्या नेस्टरुट्सद्वारे, सध्या स्वतःच्या संकेतस्थळासह विविध व्यासपीठांच्या माध्यमातून फर्निचर, डायनिंग आणि टेबलवेअर श्रेणींचा पुरवठा करणाऱ्या इतर नामांकित बाजारपेठांमध्ये विक्री केली जाते. स्टार्टअपची ही पहिलीच गुंतवणूक फेरी आहे.वी फाऊंडर सर्कलचे संस्थापकचे सीईओ आणि सीओ श्री नीरज त्यागी यांनी सांगितले की, “भारतातील ग्राहकांचे वर्तन हळूहळू शहरी जीवनशैलीकडे सरकत आहे यामुळे होम डेकोर बाजारपेठेला स्थिरपणे चालना दिली जात आहे. तसेच जागतिक पातळीवर सध्याच्या महामारीच्या दरम्यान होम डेकोर ही ऑनलाइन पद्धतीने सर्वात वेगाने वाढणारी श्रेणी आहे, कारण घरे ही केवळ जगण्या पलीकडे आकर्षणाची केंद्र बनली आहेत. 


 

आज घर हे आपले विस्तारित कार्यालय, करमणूक क्षेत्र, पार्टीचे ठिकाण आणि बरेच काही बनले आहे. नेस्टरुट्स सारख्या होम डेकोरेशन स्टार्टअपसाठी या सर्व घटकांनी एकत्रितपणे अनुकूल परिस्थिती निर्माण केली आहे.”नेस्टरुट्सद्वारे निधीचा वापर डिजिटल मार्केटींग, ग्राहकांसाठी अधिक चांगले यूआय यूएक्स निर्माण, विक्रेत्यांशी संबंध सुलभ करण्याची आणि उत्पादनांच्या अधिक श्रेणी तयार करण्याची योजना यांसाठी करण्यात येणार आहे.नेस्टरुट्स या होम डेकोर स्टार्टअपच्या संस्थापिका कु. छावी सिंग म्हणाल्या, "आमच्या उत्पादन श्रेणीला, विभागातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे आणि त्यांना ती आवडली आहे. आता आम्ही स्वस्त दरात, सौंदर्यदृष्ट्या उच्च दर्जाची आणि टिकाऊ उत्पादने प्रदान करून, ग्राहकांचा आधार वाढवण्यावर आमचे लक्ष केंद्रित केले आहे. निधीच्या या फेरीद्वारे आम्हाला, नेस्टरुट्सचे डिजिटल विपणन सल्लागार म्हणून हितेश धवन यांना संस्थेमध्ये सामील करून घेण्याची संधी देखील मिळाली आहे. म्हणूनच, हा राऊंड केवळ आर्थिक मदतीपुरताच मर्यादीत नाही तर, त्यामुळे आम्ही धोरणात्मक आणि सल्लागार सहाय्य देखील प्राप्त करू शकतो,”

वी फाऊंडर सर्कलची नेस्टरुट्स मध्ये गुंतवणूक वी फाऊंडर सर्कलची नेस्टरुट्स मध्ये गुंतवणूक Reviewed by News1 Marathi on July 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads