Header AD

पावसामुळे उंबर्डे गावातील दोनशे एकर शेती पाण्याखाली


■कचरा प्रकल्पातील कचरा शेतीत पसरल्याने शेतीचे नुकसान..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सतत पडणाऱ्या पावसा मुळे उंबर्डे गावातील दोनशे एकर शेती पाण्याखाली गेल्याचे विदारक दृश्य कल्याण मध्ये पाहायला मिळाले. कल्याण पश्चिममध्ये असणाऱ्या उंबर्डे गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प असून हा प्रकल्प देखील पाण्यात गेल्याने या प्रकल्पातील कचरा वाहून गावातील शेतीमध्ये पसरला आहे.उंबर्डे गावातील सुमारे २०० एकर शेतीमध्ये एकीकडे पाणी तर दुसरीकडे पाण्यात डम्पिंग ग्राउंडचा कचरा आल्याने कचरा मिश्रित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून शेतीचे नुकसान देखील झाले आहे. उंबर्डे घनकचरा प्रकल्प बंद करा नाहीतर आम्हाला विष देऊन मारून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. हा घन कचरा प्रकल्प बंदिस्त करण्याची मागणी स्थानिकांनी वारंवार केली असून केडीएमसीने याकडे दुर्लक्ष केल्याने हि परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस चिंतामण लोखंडे यांनी केला आहे.कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गाव हे नदी व खाडी परिसराला लागून आहे. गेल्या चार दिवसापासुन सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे उंबर्डे येथील केडीएमसीची घनकचरा प्रकल्प पाण्याखाली गेला. त्याठिकाणी असलेला कचरा पाण्यात नागरीकांच्या घरांमध्ये आला आहे. पाण्याचा प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांची 200 एकर भात शेती पाण्याखाली गेली आहे. त्यातही कचरा गेल्याने शेतीला नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. हा प्रकल्प याठिकाणी नको होता. त्याला नागरीकांचा विरोध होता. मात्र महापालिकेने नागरीकांचा विरोध न जुमानता याठिकाणी प्रकल्प केला. हा प्रकल्प बंदिस्त असावा अशी नागरीकांची मागणी होती.महापालिकेने हा प्रकल्प बंदीस्त केलेला नाही. त्यामुळे उघडय़ावरील कचरा पाण्याने सर्व गावानजीक पसरला आहे. शेतीत गेला आहे. शेतक:याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील सगळा कचरा केवळ उंबर्डे येथे टाकण्याचा महापालिकेचा अट्टाहास का असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक चिंतामणी लोखंडे आणि बबन कारभारी यांनी केला आहे. उंबर्डेत नागरीक राहत नाही का त्यांचा जीव हा जीव नाही का. या प्रकल्पामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरायुक्त दुर्गंधी पाण्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकल्प अन्यत्र हटविण्यात यावा अन्यथा आम्हाला  विष देऊन मारुन तरी टाका अशी व्यथा या गावकऱ्यांनी मांडली आहे.

पावसामुळे उंबर्डे गावातील दोनशे एकर शेती पाण्याखाली पावसामुळे उंबर्डे गावातील दोनशे एकर शेती पाण्याखाली Reviewed by News1 Marathi on July 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads