Header AD

तारक मेहता का उलटा चष्मा फेम मूनमून दत्तावर ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे वाल्मिकी विकास संघाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन

 




मुंबई दि. 2 -  तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील बबिता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री मूनमून दत्ता यांनी  मागील महिन्यात युट्युब वर एक व्हिडियो अपलोड करून  वाल्मिकी समाजाचा अपमान केला आहे. त्या प्रकरणी मूनमून दत्ता या  अभिनेत्रीवर ऍट्रोसिटी कायद्या अंतर्गत कारवाई करावी या मागणीचे निवेदन आज वाल्मिकी विकास संघाच्या शिष्टमंडळाने आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची भेट घेऊन दिले. यावेळी वाल्मिकी विकास संघाचे अध्यक्ष नरेश बोहित उपस्थित होते.


         

           वाल्मिकी विकास संघाने अभिनेत्री मूनमून दत्ता विरुद्ध मुंबईत आंबोली पोलीस ठाणे येथे दि.26 मे 2021 रोजी ऍट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.मात्र या अभिनेत्रीवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती देत मूनमून दत्तावर कायदेशीर कारवाई करावी याबाबत चे निवेदन वाल्मिकी विकास संघातर्फ़े ना रामदास आठवले यांना देण्यात आले.



         यावेळी कोणत्याही व्यक्तीने अनुसूचित जाती जमतीच्या  व्यक्तीचा जातीवाचक अपशब्द काढून अथवा संपूर्ण समाजाचा हीन लेखण्याच्या उद्दिष्टाने सार्वजनिक उल्लेख करणे अपराध आहे.मूनमून दत्ता यांनी युट्युब वर अपलोड केलेल्या व्हिडियोतून वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.या प्रकरणी पोलीस उपयुक्तांशी संपर्क करून माहिती घेऊ असे आश्वासन ना रामदास आठवले यांनी वाल्मिकी विकास संघाच्या शिष्टमंडळाला दिले.

तारक मेहता का उलटा चष्मा फेम मूनमून दत्तावर ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे वाल्मिकी विकास संघाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन तारक मेहता का उलटा चष्मा फेम  मूनमून दत्तावर ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे वाल्मिकी विकास संघाच्या  वतीने  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन Reviewed by News1 Marathi on July 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads