Header AD

भिवंडीत खदाणीच्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू सतरा तासांनी मृतदेह काढले बाहेर

 
भिवंडी दि 1 (प्रतिनिधी ) मित्रांसोबत खदाणीच्या तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील पोगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली आहे.शांतीनगर गायत्री नगर परिसरातील मुले बुधवारी दुपारी तीन वाजता पोगाव म्हसकर पाडा येथील खदानीत साचलेल्या पाण्याच्या तलावात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे .
       मोहम्मद यासिम मोहम्मद ईस्लाम शेख ( वय-15 वर्षे, रा. शांतीनगर) व मोहम्मद इम्रान वकिल अहमद खान ( वय 18 वर्षे, रा. गायत्री नगर ) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक तालुका पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी शोध मोहीम सुरू केली परंतु मृतदेह मिळून न आल्याने व अंधार पडू लागल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.
        गुरुवारी सकाळी सात वाजता पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यावर सतरा तासा नंतर स्थानिकांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्या बाहेर काढले  दरम्यान मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांनी मृतदेह परस्पर घरी घेऊन जाण्याचा हट्ट पोलिसां कडे करून हुज्जत घालीत मृतदेह घरी घेऊन गेले परंतु त्या नंतर कुटुंबियांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदना साठी आयजीएम रुग्णालयात घेऊन आले .या दुर्घटने बाबत तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे .
भिवंडीत खदाणीच्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू सतरा तासांनी मृतदेह काढले बाहेर भिवंडीत खदाणीच्या तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू सतरा तासांनी मृतदेह काढले बाहेर Reviewed by News1 Marathi on July 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads