Header AD

तरुणीला आणि दोन तरुणांना जमावा कडून बेदम मारहाण

 

■कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील धक्का दायक घटना कोळसे वाडी पोलीस सेटिंग बाज आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप....कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  एका तरुणीसह २ तरुणांना मध्यरात्री जमावाने बेदम मारहाण केल्याची कल्याण पूर्वेतील कोसळसेवाडी भागात घडली आहे. याप्रकरणी आता ९ तासानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षावाल्यासह बेदम मारहाण करणाऱ्या अज्ञात जमावाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर राहुल गडेकरबंटी प्रधान असे बेदम मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारमारहाण झालेली तरुणी डोंबिवलीत राहत असून शुक्रवारी रात्री उल्हासनगर परिसरात मैत्रिणीच्या घरी तिच्या वाढदिवसाला गेली होती. वाढदिवस संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तरुणीने रिक्षा घेतली आणि ती घरी परतत होती. यावेळी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील रस्त्यावर रिक्षाचालकाने तिची छेड काढली. यामुळे घाबरून या तरुणीने तिचे मित्र राहुल गडेकरबंटी प्रधान या दोघांना फोन डोंबिवली वरून बोलावले. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले असताछेड काढणारा रिक्षाचालक आणि जमावाने या दोन्ही तरुणांना पट्ट्याने व लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. एवढेच काय तर या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली.       या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी घटना घडून तब्बल ९ तासाने गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या जमावाचा शोध घेत ८ हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र रिक्षाचालक असलेला मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.या विषयावर आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिसांवर टीका करत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यासाठी जातो त्यालाच गुन्हेगार बनवलं जात त्याचबरोबर तक्रारदार व आरोपी मध्ये सेटिंग करतात चांगली सेटिंग झाली तर दोघांना सोडून दिले जाते अन्यथा दोघांवरही कारवाई केली जाते अशाप्रकारे  पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला यामुळेच कल्याण गुन्हेगारी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणीला आणि दोन तरुणांना जमावा कडून बेदम मारहाण तरुणीला आणि दोन तरुणांना जमावा कडून बेदम मारहाण Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads