Header AD

कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचाही राज्य सरकारने विमा योजनेत समावेश करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सन्मान देवदूतांचा कार्यक्रमात कोरोना योद्ध्यांचा सत्कार


कोरोनाच्या लढ्यात मनोधैर्य महत्वाचे असून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे मनोधैर्य चैतन्य देण्याचे काम करतात - देवेंद्र फडणवीस


मुंबई  दि. 4 -  कोरोनाच्या काळात रुग्णसेवेसाठी झोकून देणारे डॉक्टर आरोग्य कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. कोरोना काळात पत्रकारांनी कोरोना योद्धा म्हणून कार्य केले आहे.कोरोनयोद्ध्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षणाचे कवच देण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने पत्रकारांना कोरोनयोद्धा म्हणून मान्यता देऊन त्यांचा विमा योजनेत समावेश करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.         महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फ़े सन्मान देवदूतांचा या  विशेष कार्यक्रमात कोरोनयोद्ध्यांचा सन्मान ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ना रामदास आठवले बोलत होते यावेळी विचारमंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ; आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे ; विजय सिंह पटवर्धन; आशुतोष पाटील; विवेक गिरधारी;  आयोजक किरण जोशी; पी एन कदम आदी मान्यवर उपस्थित होते. 


 

          कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करू.राज्य सरकार ला केंद्र सरकार तर्फे पूर्ण सहकार्य राहील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वजण एकत्र मुकाबला करू असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.          माझं ऐकलं असत तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते. मी त्यांना अडीज अडीज वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेने सोबत वाटून घेण्याचा सल्ला दिला होता.शिवसेना भाजप चे पटत नसेल तर मला मुख्यमंत्री करा असाही मी सल्ला दिला होता असे ना रामदास आठवले यांनी यावेळी आठवण सांगितली.            कोरोना शी लढताना  औषधोपचारा सोबत मनोधैर्य महत्वाचे आहे. जगण्याची ईच्छा महत्वाची आहे.मनात चैतन्य समावणे महत्वाचे आहे.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जातील तिथे चैतन्य निर्माण करतात.त्यांनी गो कोरोना चा नारा दिला. कोरोना ची भीती दूर करण्यासाठी मनोधैर्य महत्वाचे आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.त्यानंतर ना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून सभागृहात चैतन्य निर्माण केले.


 महाराष्ट्राचे आरोग्य खाते सांभाळणे नाही सोपे; पण त्याला पुरून उरले राजेश टोपे अशी कविता करीत ना रामदास आठवले यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कौतुक केले. 


ज्याच्या लेखणीला असते जबरदस्त धार

जो मानत नाही कुणा समोर हार 

तोच खरा पत्रकार असे सांगत पत्रकारांना महाराष्ट्र सरकार ने कोरोनायोद्धा म्हणून दर्जा द्यावा असे आवाहन केले. 


कोविड पेशंट होतो मी सुद्धा

पण तुम्ही आहात कोरोना योद्धा

मी वंदन करतो शिवराय भीमराय गौतम बुद्धा

माझ्या मनात आहे त्यांच्याबद्दल श्रद्धा 


घरघर चालत असत जस जात

तसेच असते माणुसकीचे नातं

बँकेत असतं खातं

तसं नसतं माणुसकीचं नातं


कोरोना ने साऱ्या जगाला नाचविले 

पण डॉक्टरांनी रुग्णांना वाचविले

मी अनेकांना रुग्णालयात पाठविले 

तेंव्हा मला बॉम्बे हॉस्पिटल मधील माझे दिवस आठवले


अशी कविता सादर करून ना रामदास आठवले यांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले. 

कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचाही राज्य सरकारने विमा योजनेत समावेश करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सन्मान देवदूतांचा कार्यक्रमात कोरोना योद्ध्यांचा सत्कार कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचाही राज्य सरकारने विमा योजनेत समावेश करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सन्मान देवदूतांचा कार्यक्रमात कोरोना योद्ध्यांचा सत्कार Reviewed by News1 Marathi on July 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads